उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संक्षिप्त परिचय (Eknath Shinde)
जन्म : ६ मार्च १९६४.
जन्म ठिकाण : अहिर, तालुका – महाबळेश्वर, जिल्हा – सातारा.
शिक्षण : बी.ए.
ज्ञातभाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी.
वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती लता.
अपत्ये : एकूण १ (एक मुलगा).
व्यवसाय : उद्योग व सामाजिक कार्य
पक्ष : शिवसेना
मतदार संघ : १४७ – कोपरी – पाचपाखाडी, जिल्हा – ठाणे.
इतर माहिती :
ठाणे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष, सन १९८६ मध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न आंदोलनात १०० कार्यकर्त्यांसह सक्रीय सहभाग, ४० दिवस बेल्लारी येथे तुरुंगवास सहन केला, संपूर्ण ठाणे शहर व जिल्ह्यात सामाजिक कार्याचे जाळे निर्माण केले; ठाणे शहरात ओपन आर्ट गॅलरी, सचिन तेंडुलकर मिनी स्टेडियम, इंटरनिटी सुविधा भूखंडावर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक, शहिद हेमंत करकरे क्रीडा संकूल, जॉगिंग पार्क, सेंट्रल लायब्ररी सुरु केली; आदिवासी प्रभाग मोखाडा, तलासरी व जव्हार येथील आश्रम शाळेत व आरोग्य केंद्रात सकस आहार व आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन करुन गरीब रुग्णांना विनामुल्य औषध वाटप केले; पालघर, बोईसर व सफाळे परिसरात शिवसेने तर्फे एस.एस.सी. विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन, गरीब विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्यांचे वाटप, पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन, बाल नाट्य महोत्सवाचे व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, ‘जाणताराजा’ नाटकाचे अत्यल्पदरात आयोजन, अध्यक्ष, ठाणे जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन; उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अॅथलेटिक्स संघटना, पूरग्रस्तांना मदत,
ठाणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व आधुनिकीकरणासाठी विशेष योगदान; एमएमआरडी सक्षम बनविण्यात यश, नागपूर – मुंबई समृध्दी महामार्ग, वांद्रे- वरळी सी लिंक, वाशी येथील तिसरा खाडीपुल, मुंबई –पुणे द्रुतगतीमार्गची क्षमता वाढविण्यासाठी खालपूर- लोणावळा टनेल मार्ग, शिळ – कल्याण रस्त्याचे सहापदरीकरण, विदर्भात रेल्वेच्या २७ उड्डाणपूलाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न; राज्यातील द्रुतगती मार्गावरील उपधान कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या; ओझर्डे येथे ट्रामा केअर सेंटर सुरू केले; आरोग्य मंत्रीपदाच्या काळात आशा सेविकांची पगार वाढ केली; आदिवासी व दुर्गम भागात काम करणाऱ्या बी.ए.एम.एस. पदवी धारक कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला.
ठाणे शहरातील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास केला; ठाणे मेट्रोच्या कामाला गती दिली; ठाणे-मुलुंड दरम्यान नव्या स्थानकाला मंजुरी मिळविली; ठाणे जिल्ह्यासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या काळू धरणाच्या अडचणी सोडविण्यात यश; बारवी धरणाची उंची वाढविण्यासाठी मंजूरी मिळविली; एमएमआरडीला क्लस्टर योजना सुरू केली; ठाणे जिल्हा परिषद, तसेच कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, महानगरपालिकेत व अंबरनाथ, बदलापूर नगर परिषदेत शिवसेनेची सत्ता आणण्यात यश; १९८४ शिवसेना शाखा प्रमुख, वागळे इस्टेट, किसननगर; शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख; पक्षाच्या सर्व आंदोलनात सक्रिय सहभाग, १९९७ व २००२ दोन वेळा नगरसेवक, तीन वर्षे स्थायी समिती सदस्य, चार वर्षे सभागृह नेता, महानगरपालिका ठाणे.
२००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९ २०१९-२०२४ सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; २०१४-२०१९ विधीमंडळ शिवसेना पक्षाचे गट नेते; १२ नोव्हेंबर २०१४ ते ५ डिसेंबर २०१४ विरोधीपक्ष नेता, महाराष्ट्र विधानसभा; ५ डिसेंबर २०१४ ते नोव्हेंबर २०१९ सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री; तसेच जानेवारी २०१९ सार्वजनिक आरोग्य खात्याचा कार्यभार व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री; डिसेंबर २०१९ पासून शिवसेनेचे गट नेते; नोव्हेंबर २०१९ –जून २०२२ नगर विकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खात्याचे मंत्री. (Eknath Shinde)
३० जून २०२२ रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ. खाती – सामान्य प्रशासन, नगरविकास, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर नोव्हेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड, दिनांक ५ डिसेंबर २०२४ रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ.
Eknath Shinde
हे ही वाचा :
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला, कुणाला किती मंत्रीपदं मिळणार?
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून आढावा
मोठी बातमी : महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी सोहळा ; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मोठी बातमी : बॉटल बंद पाणी ‘अतिधोकादायक’ यादीत, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार ? महत्त्वाची माहिती समोर
आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्समध्ये विविध पदांच्या 723 जागांसाठी भरती