मनिला : फिलिपाइन्स मध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याचे सरकारने जाहीर केले आहे. अचानक झालेल्या प्रचंड स्फोटानंतर गॅस, राख आणि कचरा सर्वत्र पसरला आहे. फिलिपाइन्समधील ताल ज्वालामुखीतून राखेचे मोठे ढग आसमंतात दिसत आहेत, त्यामुळे राजधानी मनिलाजवळील अनेक भागांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
फिलिपाइन्स इन्स्टिट्यूट ऑफ व्होल्कॅनोलॉजी अँड सिस्मोलॉजी (फिव्होलक्स) ने सांगितले की, ज्वालामुखीतून निघणारा धूर आणि राख ढग आकाशात 1500 मीटर म्हणजेच 1.5 किलोमीटरपर्यंत वर आल्याचे दिसले. प्रशासनाने हजारो लोकांना संपूर्ण परिसर रिकामा करण्यास सांगितले आहे. शहरात गॅस आणि लाव्हा रस पसरून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.
मुंबईतील कांदिवली परिसरात इमारत कोसळली !
ज्वालामुखीचा आणखी उद्रेक झाल्यास त्सुनामी येऊ शकते, असे फिवोल्क्स यांनी सांगितले. फिवोल्क्सने लेव्हल थ्री अलर्ट जारी केला होता, याचा अर्थ आणखी स्फोट होण्याची शक्यता आहे.
त्यात म्हटले आहे की, ‘ताल ज्वालामुखीबाबत लेव्हल थ्री अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ताल ज्वालामुखी बेट आणि बटांगसमधील एगोन्सिलो शहरात, बिलीबिनवांग आणि बन्यागा ही शहरे रिकामे केली जाणार आहेत. ताल तलावावरील सर्व कामकाज थांबवण्यात आले आहे आणि विमानांना या भागात न येण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आद्यपही कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
अबब ! 4.66 कोटी रुपये किंमतीचे ड्रग्ज जप्त, अंमली पदार्थ विरोधी कक्षाची कारवाई
6.80 लाख किंमतीचा गांजा जप्त, अंमली पदार्थ विरोधी कक्षाची कारवाई
१० पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 3603+ जागांसाठी मेगा भरती