मुंबई : भाजप (BJP) चे नेते किरीट सोमय्या (kirit somiya) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी जोरदार दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. तर सोमय्यांनीच आमच्या अंगावर गाडी चढवली असा आरोप शिवसैनिकांनी केला आहे.
किरीट सोमय्या आज रात्री खासदार नवनीत राणा (MLA Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांची भेट घेण्यासाठी खार पोलीस स्टेशनला गेले होते. यावेळी किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. किरीट सोमय्या परत जात असताना खार पोलीस स्टेशनबाहेर त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी दगड फेकल्याचे समोर आलं आहे.
खार पीएसमधून बाहेर पडल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट केले की, “शिवसेनेच्या गुंडांकडून खार पोलिस स्टेशनवर जोरदार दगडफेक, माझ्या कारच्या खिडकीच्या काचा फोडल्या, मी जखमी झालो, वांद्रे पोलिस ठाण्यात धाव घेतली.”
ट्रक – जीप चा भीषण अपघात, 7 ठार
कोकण कृषी विद्यापीठात तब्बल 30,000 रूपये पगाराची नोकरी, 2 दिवस शिल्लक
सुवर्णसंधी ! मुंबई उच्च न्यायालयात 4 थी पास साठी तब्बल 47,000 रूपये पगाराची नोकरी