Sunday, March 16, 2025

जुन्नर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माई अमोल लांडे यांनी भेट घेऊन केले स्वागत

जुन्नर : जुन्नर शहरातील भव्य दिव्य अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार जुन्नर दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अमोल लांडे आणि त्यांच्या पत्नी सोनाली उर्फ माई लांडे यांनी अजित दादांची भेट घेवुन त्यांचे स्वागत केले. यावेळी महिलांसाठी, आदिवासी विभागासाठी चांगले काम कर मी तुझ्या पाठीशी उभा आहे असा शब्द अजितदादा यांनी माई लांडे यांना दिला. यावेळी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके हे देखील उपस्थित होते.

माई लांडे यांची आक्रमक भाषण शैली पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महिलांसाठीचा एक आक्रमक चेहरा म्हणून त्या भविष्यात पुढे येऊ शकतात अशी चर्चा होताना दिसत आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles