Photo : Twitter / Asaduddin Owaisi |
मेरठ : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याचे वृत्त समोर येत आहे. यात ते सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत ओवेसी यांनी ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, “काही वेळापूर्वी माझ्या गाडीवर चिजारसी टोल गेटवर गोळीबार झाला होता. 4 राऊंड गोळीबार. तेथे ३-४ जण होते, सर्वजण शस्त्रे तेथेच सोडून पळून गेले. माझी गाडी पंक्चर झाली, पण मी दुसऱ्या गाडीत बसून तिथून निघालो. आम्ही सर्व सुरक्षित आहोत. अलहमदुलिल्लाह”घरकुलच्या प्रतिक्षेत असलेल्या ‘ड’ यादी धारकांसाठी खुशखबर ! ‘या’ तारखेपर्यंत मिळणार १०० टक्के मंजूरी
कुछ देर पहले छिजारसी टोल गेट पर मेरी गाड़ी पर गोलियाँ चलाई गयी। 4 राउंड फ़ायर हुए। 3-4 लोग थे, सब के सब भाग गए और हथियार वहीं छोड़ गए। मेरी गाड़ी पंक्चर हो गयी, लेकिन मैं दूसरी गाड़ी में बैठ कर वहाँ से निकल गया। हम सब महफ़ूज़ हैं। अलहमदु’लिलाह। pic.twitter.com/Q55qJbYRih
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) February 3, 2022
ओवेसी मेरठ विधानसभेच्या इस्लामाबाद भागात आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गेले होते त्यावेळी ही घटना घडली.
संतापजनक : दलित वस्तीचा पाणीपुरवठा बंद केल्याने दलित कुटुंबीयांवर गाव सोडण्याची वेळ
सांगण्यात येत आहे की, ओवेसी दिल्लीला निघाले होते आणि छिजारसी टोल प्लाझाजवळ पोहोचले होते, तेव्हाच त्यांच्या ताफ्यावर गोळीबार झाला होता. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. ओवेसींच्या गाडीवरही गोळ्यांच्या खुणा आहेत. ताफ्यातील एक-दोन गाड्या पंक्चर झाल्याचं सांगण्यात येत आहे.
माध्यमांशी बोलताना ओवेसी म्हणाले की, काही लोकांना माझी हत्या करायची आहे, या हल्ल्यामागे मोठा विचार आहे, तसेच अशा हल्ल्यांना मी घाबरत नाही. या हल्ल्याचा निष्पक्ष तपास करण्याची मागणी त्यांनी केली.
बांधकाम कामगारांसाठी खुशखबर : अर्थसहाय्याच्या तीन नवीन योजनांना मंजुरी
या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे तर एक आरोपी फरार झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.