Monday, March 17, 2025

अभिनेते किरण माने उद्या पत्रकार परिषद घेऊन अनेक गुपितं खुलासे उलगडणार !

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now
Photo: Kiran Mane / Facebook

मुंबई : अभिनेते किरण माने यांनी “राजकिय पोस्ट” केल्याने त्यांना “मुलगी झाली हो” या स्टार प्रवाह वरील मालिकेतून काढण्यात आल्याचा आरोप माने यांनी काही दिवसांपुर्वी केला होता. आता किरण माने पत्रकार परिषद घेऊन अनेक गुपितं खुलासे उलगडणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

बांधकाम कामगारांसाठी खुशखबर : अर्थसहाय्याच्या तीन नवीन योजनांना मंजुरी

अभिनेते किरण माने यांनी केलेल्या आरोपानंतर चॅनेलकडून खुलासा करण्यात आला होता की, महिला सहकलाकारांनी केलेल्या तक्रारीवरून त्यांना काढण्यात आले आहे, मात्र किरण माने यांच्यावरून मीडियाशी बोलताना सहकलाकारांमध्ये फुट पडल्याचे दिसले. त्यावेळी काही कलाकरांनी किरण माने यांची बाजू घेतली तर काहींनी त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले.

घरकुलच्या प्रतिक्षेत असलेल्या ‘ड’ यादी धारकांसाठी खुशखबर ! ‘या’ तारखेपर्यंत मिळणार १०० टक्के मंजूरी

या प्रकरणावर आता अभिनेते किरण माने शुक्रवारी दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. यातून अनेक खुलासे करायचे आहेत, तसेच अनेक गुपितं उलगडायची असल्याचे त्यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हटले आहे. या पत्रकार परिषदेत माने यांचे वकिल असिम सरोदे-रमा सरोदे असणार आहे.

अभिनेते किरण माने यांची संपुर्ण फेसबुक पोस्ट वाचण्यासाठी क्लिक करा.

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांसाठी भरती

10 वी – 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) मध्ये 1501 जागांसाठी भरती

Related Articles

- Advertisement -

Latest Articles