Thursday, December 12, 2024
Homeआंतरराष्ट्रीयब्रेकिंग : इस्रायलचा सिरियावर क्षेपणास्त्र हल्ला; युद्ध पसरण्याचा धोका 

ब्रेकिंग : इस्रायलचा सिरियावर क्षेपणास्त्र हल्ला; युद्ध पसरण्याचा धोका 

दमास्कस : इस्त्रायली हवाई दलाने गुरुवारी दुपारी 1.30 वा अचानक सिरियाच्या दमास्कस आणि अलेप्पो आंतरराष्ट्रीय विमानतळ व बंदर परिसरात हवाई हल्ले करून विमानतळाच्या धावपट्ट्या उध्वस्त केल्या आहेत.

सीरियात इराणी विमानातून इस्त्रायल विरोधी हिजबुल्ला दहशतवादी गटाला मदत मिळत असते, यापूर्वी 14 ऑगस्ट रोजी इस्रायली विमानांनी राजधानी दमास्कस आणि टार्टसजवळ हल्ले केले होते. त्यावेळी 3 सीरियन सैनिक ठार झाले. इतर 3 जण जखमी झाले होते.

इस्रायल व सीरिया यांच्यामध्ये पॅलेस्टाईन प्रश्नावरून सुरवातीपासून मोठा संघर्ष आहे. सीरिया, इराण, लॅबोनॉन यांच्या मदतीमुळे पॅलेस्टाईन मधील अतिरेकी गटाला मदत मिळते, असा इसरायलचा प्रथमपासून आरोप आहे.

सीरियातील सरकारी टीवी चॅनलने या हल्ल्याची पुष्टी दिली आहे. कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय