Saturday, December 21, 2024
Homeराज्यब्रेकिंग : बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

ब्रेकिंग : बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्या  बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल करण्यात आला आहे. याबाबतचे परिपत्रक मंडळाने जारी केले आहे.

बारावीची परीक्षा 4 मार्च पासून ऑफलाइन पद्धतीने सुरू होणार होती. मात्र, मंडळाने 5 आणि 7 मार्चच्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल केला आहे. 5 मार्चचे पेपर आता 5 एप्रिलला होणार आहेत. तर, 7 मार्चचे पेपर आता 7 एप्रिलला होणार आहेत. तर बारावी आणि दहावीच्या लेखी व अन्य परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रकामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 

पुणे नाशिक महामार्गावर बोर्डाच्या वाहनाला संगमनेर येथे आग लागली होती. त्या आगीत बोर्डाचे पेपर जळून खाक झाल्याने हे पेपर पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत मुख्यमंत्र्यांच्या “या” सूचना

12 वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! 5000 पदांसाठी मेगा भरती

मुली रात्री एकांतात मोबाइलवर काय सर्च करतात ? या चार गोष्टी आहेत

संबंधित लेख

लोकप्रिय