Monday, February 3, 2025

कपिल शर्मासह ‘या’ बॉलीवूड कलाकारांना जीवे मारण्याची धमकी, बॉलीवूडमध्ये खळबळ

मुंबई : बॉलीवूडमधील लोकप्रिय कलाकार कपिल शर्मा, राजपाल यादव, सुगंधा मिश्रा आणि कोरिओग्राफर रेमो डिसूझा यांना जीवे मारण्याची धमकी देणारी घटना समोर आली आहे. या कलाकारांना ईमेलद्वारे धमकी दिली गेली असून, त्यांच्या कुटुंबीयांनाही लक्ष्य करण्याची चेतावणी देण्यात आली आहे. या घटनेने बॉलीवूडसह त्यांच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. (Bollywood actors Threat)

कपिल शर्माला आलेल्या ईमेलमध्ये लिहिले आहे की, “आम्ही तुमच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहोत. हा प्रसिद्धीचा स्टंट नाही. जर तुम्ही आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर परिणाम गंभीर होतील.” धमकी देणाऱ्याने पुढील आठ तासांत प्रतिसादाची मागणी करत धमकी देण्यात आली आहे.

Bollywood actors Threat

धमकीचा ईमेल आल्यानंतर संबंधित कलाकारांनी तात्काळ अंबोली पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 351(3) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हा ईमेल पाकिस्तानमधून पाठवला गेला असल्याचा संशय आहे. ईमेलमध्ये शेवटी ‘BISHNU’ असे लिहिले असून, त्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून धमकी देणाऱ्याचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. या घटनेमुळे संबंधित कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बॉलीवूडमध्ये अशा प्रकारच्या धमक्या यापूर्वीही आल्या आहेत, मात्र या वेळी थेट कलाकारांच्या कुटुंबीयांना लक्ष्य केल्याने चिंता वाढली आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात, १५ हजार शिक्षकांची होणार भरती

महाराष्ट्रावर कर्जाच्या बोजा, सरकारच्या तिजोरीवर ₹ 96,000 कोटींचा भार

स्टाफ रूममधील शिक्षक-शिक्षिकेचा अश्लील व्हिडिओ व्हायरल, संबंधित शिक्षक निलंबित

LIC कडे ₹880 कोटींची दावा न केलेली रक्कम; तुमची रक्कम असू शकते का?

पुण्यात दुर्मिळ गुइलेन बॅरे सिंड्रोमचा शिरकाव, वाचा काय आहे नेमका आजार

जिओचा ग्राहकांना मोठा दणका, ‘हा’ प्लॅन 100 रूपयाने महागणार

धक्कादायक : ज्योतिबा डोंगरावर प्रसादात आढळला ब्लेडचा तुकडा, भाविकांच्या जीवाशी खेळ!

भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र अंतर्गत भरती

Related Articles

- Advertisement -

Latest Articles