कोल्हापूर : ज्योतिबा डोंगरावर (Jyotiba Temple) भाविकांच्या प्रसादाच्या कुंद्यात ब्लेडचा तुटलेला तुकडा सापडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. शिवाजी पुतळा परिसरातील मिठाई दुकानातून खरेदी केलेल्या खव्याच्या बर्फीत हा प्रकार आढळून आला. या धक्कादायक घटनेने देवस्थान परिसरात भाविकांच्या आरोग्याच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
यापूर्वीही ज्योतिबा डोंगरावरील पेढा आणि खव्याच्या पदार्थांमध्ये भेसळ झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. विशेषतः, चैत्र यात्रेदरम्यान दोन टन भेसळयुक्त खवा आणि पेढा सापडल्याची बाब उघडकीस आली होती. त्यावेळी अन्न व औषध प्रशासनाने काही कारवाई केली होती, परंतु त्यानंतर कोणतीही ठोस उपाययोजना झाली नाही, अशी तक्रार माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे यांनी केली आहे.
भाविकांच्या जीवाशी खेळ, कारवाईची मागणी (Jyotiba Temple)
प्रसादात ब्लेड आढळल्याने भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नवाळे यांनी संबंधित दुकानदारांसह अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, “ज्योतिबाच्या डोंगरावर विक्रीसाठी येणाऱ्या मिठाई पदार्थांवर उत्पादन तारीख आणि एक्सपायरी तारीख नसते. महिना-दीड महिना जुनी मिठाई विकली जाते, जी भाविकांच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. वेळीच उपाययोजना झाली नाही तर गंभीर परिणाम होतील.”
मूळ मूर्तीच्या संवर्धन प्रक्रियेस सुरुवात
दरम्यान, ज्योतिबाच्या प्राचीन मूर्तीच्या झीज झालेल्या भागांचे संवर्धन करण्यासाठी उद्यापासून (21 जानेवारी) प्रक्रिया सुरू होणार आहे. ही प्रक्रिया चार दिवस चालणार असून, पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जाईल. या काळात भाविकांसाठी उत्सव मूर्ती मंदिरातील कासव चौकात ठेवण्यात येईल.


हे ही वाचा :
स्टाफ रूममधील शिक्षक-शिक्षिकेचा अश्लील व्हिडिओ व्हायरल, संबंधित शिक्षक निलंबित
दिनेश वाघमारे यांची राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात कोर्टाने पोलिसांना ठरवलं दोषी
राज्यातील ‘या’ ठिकाणी बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, प्रशासनाकडून ‘अलर्ट झोन’ घोषित
अभिनेत्री हेमा मालिनी यांना ‘पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान पुरस्कार’ प्रदान
करणवीर मेहराने ‘बिग बॉस १८’ची ट्रॉफी जिंकत रचला इतिहास
भालाफेकपटू नीरज चोप्रा अडकला लग्नबंधनात, लग्नाचे फोटो व्हायरल
धक्कादायक : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या ५ तरुणांना एसटी बसने चिरडले