Thursday, February 13, 2025

जिओचा ग्राहकांना मोठा दणका, ‘हा’ प्लॅन 100 रूपयाने महागणार

Jio postpaid Recharge plan price hike : भारतातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी जिओने आपल्या लोकप्रिय 199 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये बदल करत त्याची किंमत 299 रुपये केली आहे. या बदलामुळे ग्राहकांना 23 जानेवारी 2025 पासून दरमहा 100 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत.

199 रुपयांच्या Jio Recharge प्लॅनमध्ये बदल

जिओने 199 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये स्थलांतरित करण्याची घोषणा केली आहे. नवीन प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित कॉलिंग, 25 GB डेटा, आणि 100 एसएमएस प्रतिदिन यासारखे फायदे मिळणार आहेत. मात्र, 25 GB डेटा मर्यादा ओलांडल्यास प्रति GB 10 रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.

नवीन ग्राहकांसाठी बेसिक प्लॅन 349 रुपयांपासून सुरू

299 रुपयांचा प्लॅन केवळ सध्याच्या ग्राहकांसाठी उपलब्ध असून, नवीन ग्राहकांसाठी जिओने बेसिक पोस्टपेड प्लॅनची किंमत 349 रुपये ठेवली आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 30 GB डेटा, अमर्यादित कॉलिंग, आणि 5G नेटवर्क उपलब्धतेसह अमर्यादित 5G डेटा मिळेल.

ग्राहकांच्या बजेटवर होणार परिणाम

299 रुपयांच्या प्लॅनमध्ये 199 रुपयांच्या तुलनेत काही सुधारणा केल्या असल्या तरी, यामुळे ग्राहकांना दरमहा 100 रुपये अधिक मोजावे लागतील, ज्याचा परिणाम त्यांच्या मासिक बजेटवर होऊ शकतो. नवीन प्लॅनमध्ये 25 GB डेटा मर्यादा ठेवण्यात आली असून, यापेक्षा अधिक डेटा वापरणाऱ्या ग्राहकांना अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

स्टाफ रूममधील शिक्षक-शिक्षिकेचा अश्लील व्हिडिओ व्हायरल, संबंधित शिक्षक निलंबित

दिनेश वाघमारे यांची राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात कोर्टाने पोलिसांना ठरवलं दोषी

राज्यातील ‘या’ ठिकाणी बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, प्रशासनाकडून ‘अलर्ट झोन’ घोषित

अभिनेत्री हेमा मालिनी यांना ‘पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान पुरस्कार’ प्रदान

करणवीर मेहराने ‘बिग बॉस १८’ची ट्रॉफी जिंकत रचला इतिहास

भालाफेकपटू नीरज चोप्रा अडकला लग्नबंधनात, लग्नाचे फोटो व्हायरल

धक्कादायक : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या ५ तरुणांना एसटी बसने चिरडले

Related Articles

- Advertisement -

Latest Articles