Thursday, February 13, 2025

पुण्यात दुर्मिळ गुइलेन बॅरे सिंड्रोमचा शिरकाव, वाचा काय आहे नेमका आजार

Guillain Barre Syndrome : पुणे शहरात गुइलेन बॅरे सिंड्रोम (GBS) या दुर्मिळ न्यूरोलॉजिकल आजाराचे २२ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांचे नमुने तपासणीसाठी आयसीएमआर-एनआयव्ही (ICMR-NIV) कडे पाठवण्यात आले असून, शहरातील सिंहगड रोड परिसरातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि पूना हॉस्पिटल येथे या रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

आजाराची ओळख आणि उपचार (Guillain Barre Syndrome)

गुइलेन बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल आजार असून, दर एक लाख लोकांमागे एका व्यक्तीला होतो. हा आजार मुख्यतः मज्जातंतूंवर परिणाम करून कमरेखालच्या भागाला लकवा मारण्याइतका गंभीर होऊ शकतो. आजाराचे निदान गुंतागुंतीचे असते, ज्यासाठी पाठीच्या कण्यातील द्रव आणि चेतासंस्थेच्या चाचण्यांची आवश्यकता असते. आयव्हीआयजी (IVIG) किंवा प्लाझ्मा एक्स्चेंज सारखे उपचार वेळीच दिल्यास रुग्णांना लवकर बरे होण्यास मदत होते.

महानगरपालिकेकडून गंभीर दखल

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने या संशयित प्रकरणांच्या तपासणीसाठी तज्ज्ञ समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य प्रमुख डॉ. निना बोबडे यांनी सांगितले की, “गुइलेन बॅरे सिंड्रोम अचानक वाढला असला तरी, नागरिकांनी घाबरण्याची आवश्यकता नाही. वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या मार्गदर्शनाने परिस्थिती हाताळली जाईल.”

नागरिकांनी काय काळजी घ्यावी?

आरोग्य विभागाच्या सुचनेनुसार, कोणतीही शारीरिक कमजोरी, लकवा, किंवा हालचालींमध्ये अडथळा जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सार्वजनिक स्वच्छता आणि वैयक्तिक आरोग्याच्या सवयी पाळून संसर्गजन्य आजारांपासून बचाव करावा.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

जिओचा ग्राहकांना मोठा दणका, ‘हा’ प्लॅन 100 रूपयाने महागणार

स्टाफ रूममधील शिक्षक-शिक्षिकेचा अश्लील व्हिडिओ व्हायरल, संबंधित शिक्षक निलंबित

दिनेश वाघमारे यांची राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात कोर्टाने पोलिसांना ठरवलं दोषी

राज्यातील ‘या’ ठिकाणी बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, प्रशासनाकडून ‘अलर्ट झोन’ घोषित

अभिनेत्री हेमा मालिनी यांना ‘पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान पुरस्कार’ प्रदान

करणवीर मेहराने ‘बिग बॉस १८’ची ट्रॉफी जिंकत रचला इतिहास

Related Articles

- Advertisement -

Latest Articles