Sunday, June 1, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC:ब्लॉसम शाळेचे गायन- वादन स्पर्धेत यश

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:: वडगाव येथील वर्सेटाइल्स स्कूलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “बॕटल्स आॕफ बँड” या गायन व वादन स्पर्धेत ‘जे. एस. पी. एम. ब्लॉसम पब्लिक स्कूलने’ बाजी मारली.
या स्पर्धेत एकूण ७ शाळांतील विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यामध्ये ताथवडे येथील ‘जे. एस. पी. एम. ब्लॉसम पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच हिंदी गाणी सादर करून रसिकांची दाद मिळविली.
यामध्ये इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. कार्यक्रमाचे प्रमुख परिक्षक हर्षद कानेटकर, संयोजक जय निकम , वर्सेटाईल स्कूलच्या संचालिका संजना निकम
यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांकाचे प्रमाणपत्र व रोख रक्कम रुपये चार हजार असे पारितोषिक देण्यात आले.
संगीत शिक्षिका संयोगिता खुडे यांनी मुलांना मार्गदर्शन केले. शाळेच्या प्राचार्या स्वाती आरू तसेच उपप्राचार्या दीपा पवार यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles