Birsa Fighters : सध्या देशभरात लोकसभा निवडणूकीची रणधूमाळी सुरू आहे. राजकीय पक्षांचे जागा वाटप देखील अंतिम टप्प्यात आहे. या लोकसभा निवडणूकीत दोन वर्षापुर्वीच स्थापन झालेली बिरसा फायटर्स ही सामाजिक संघटना आता राजकारणाच्या मैदानात उतरली आहे. बिरसा फायटर्स (Birsa Fighters) आता यंदाची लोकसभा निवडणूक लढणार आहे.
नंदूरबार लोकसभा मतदारसंघासाठी बिरसा फायटर्सचे (Birsa Fighters) संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा (Sushilkumar Pawara) हे निवडणूक लढणार आहे. सुशिलकुमार पावरा यांना आता पर्यंत ५० पेक्षा अधिक संघटनांनी पाठिंबा मिळाला आहे. यात बिरसा फायटर्सचे जोयदा, चूलवड, गणोर इत्यादी २६ ग्रामपंचायत व ५० संस्था, संघटना व समितींचा समावेश आहे. आपल्याला कोणत्याही पक्षाची तिकीट मिळाली नाही तरी आपण स्वतंत्र व अपक्ष लढण्यास तयार आहोत. या ५० संघटनांचा पाठिंबा शेवटपर्यंत राहिल्यास आपण अपक्ष उमेदवार म्हणूनही ही निवडणूक जिंकू शकतो, असा विश्वास सुशिलकुमार पावरा यांनी व्यक्त केला आहे.
८ पक्षांनी तिकीट ऑफर केल्याचा दावा
सुशिलकुमार पावरा (Sushilkumar Pawara) यांनी अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी सुरू केल्यानंतर महाविकास आघाडीकडून दिल्ली येथे उमेदवारीसाठी त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्याचा दावा केला आहे. सोबतच त्यांना आता पर्यंत एकूण ८ पक्षांनी तिकीट ऑफर केल्याचाही दावा केला आहे.
आपण कोणत्याही पक्षाचे टिकीट घ्यायची नाही, अपक्ष लढायचे. हारलो काय आणि जिंकलो काय, आपल्याला काही फरक पडत नाही, अशी भुमिका बिरसा फायटर्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतल्याचे सुशिलकुमार पावरा यांनी म्हटले आहे. अपक्ष उमेदवार म्हणून लढले तरी आपण ही निवडणूक १००% जिंकू, असा विश्वासही बिरसा फायटर्सच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.


हे ही वाचा :
हार्दिक पांड्याने असे काही केले की, पांड्यावर लोक भडकले
शाहरूख खानच्या ‘त्या’ कृतीमुळे लोकांचा संताप
JNU : ‘जेएनयू’ विद्यार्थी संघाच्या निवडणूकीत डाव्यांचा दणदणीत विजय तर भाजप संलग्न अभाविपचा सुपडा साफ
‘बदला’ घेणे एवढाच उद्देश; डॉ.अमोल कोल्हे यांची घणाघाती टीका
वयोवृद्ध आणि दिव्यांगांना ‘सक्षम’ अॅपच्या माध्यमातून मिळणार अधिकच्या सुविधा
…तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू; अजित पवार गट आक्रमक
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटासाठी अंकिता लोखंडेनं एकही रूपया घेतला नाही; वाचा काय आहे कारण !