Thursday, June 12, 2025
---Advertisement---
---Advertisement---

मोठी बातमी : राजकोट किल्ल्यावर मोठा राडा, शिवरायांच्या पुतळ्या राजकारण तापले

Sindhudurg : सिंधुदुर्गातील मालवणमध्ये उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवघ्या आठ महिन्यांत कोसळल्याने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर विरोधक आक्रमक झाले असून, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शरद पवार गटाचे अध्यक्ष जयंत पाटील, आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी राजकोट किल्ल्यावर जाऊन शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी केली. त्याचवेळी भाजप नेते नारायण राणे आणि त्यांचे पुत्र निलेश राणेही किल्ल्यावर दाखल झाले. 

---Advertisement---

या दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीमुळे समर्थकांमध्ये राडा झाला. महाविकास आघाडी आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने आले, यावेळी घोषणाबाजीसह मोठा गोंधळ उडाला. पोलिसांनी मध्यस्थी करत कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु राणे समर्थक आणि पोलिसांमध्येही बाचाबाची झाली. निलेश राणे यांनी पोलिसांना ‘आमच्या कार्यकर्त्यांना हात लावू नका’ असे स्पष्ट केले, तर नारायण राणे यांनी आक्रमकपणे कार्यकर्त्यांना धमकावले.

या सर्व राड्यानंतर आदित्य ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली आणि छत्रपतींच्या पुतळ्याच्या मुद्द्यावर राजकारण न करण्याचे आवाहन केले. त्यांनी शिवरायांच्या पुतळ्याच्या उभारणीसाठी कंत्राट घेतलेल्या व्यक्तीचा तपास करण्याची मागणी केली आणि संबंधित मंत्र्यांवर कारवाई करण्याचा सवाल उपस्थित केला. (Sindhudurg)

---Advertisement---

Sindhudurg

गेल्या डिसेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा केवळ आठ महिन्यात कोसळल्याने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर महाविकास आघाडीकडून मालवण बंदची हाक देण्यात आली आहे. राजकोट किल्ल्यावर या मुद्द्यावरून हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

Telegram : टेलिग्रामवर भारतात बंदी येणार ? वाचा काय आहे प्रकरण !

शासकीय, निमशासकीय विभागात हजारो विविध पदांसाठी भरती, वाचा एका क्लिकवर !

खूशखबर ; भारतीय रेल्वेमध्ये 14,298 टेक्निशियन पदांसाठी मोठी भरती होणार

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 1846 पदांची मेगा भरती, आजच अर्ज करा

कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

मोठी बातमी : जय शाह बनणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) चे नवे अध्यक्ष

संतापजनक : छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आठ महिन्यांतच कोसळला, पंतप्रधान मोदींनी केले होते उद्घाटन

कंगना राणावतचे शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त विधान, भाजपने झटकले हात

गटप्रवर्तकांना चार हजारांची वाढ असमाधानी ; पुन्हा आंदोलनाची घोषणा

आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान लागू

---Advertisement---

Indian saree : भारतीय महिला साडी घालून जपानच्या रस्त्यावर, व्हायरल व्हिडिओ

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles