Home राज्य NIA ची मोठी कारवाई : मुंबईतून संशयित दहशतावाद्याला घेतले ताब्यात

NIA ची मोठी कारवाई : मुंबईतून संशयित दहशतावाद्याला घेतले ताब्यात

Big operation of NIA: Sarfraz Memon was detained by the police from Mumbai

मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणानी (NIA) ने मुंबई मध्ये एक मोठी कारवाई केली आहे. एनआयएकडून (NIA) दहशतवादी कारवायांविरोधात धोक्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर आता पोलिसांनी एका संशयित दहशतावाद्याला ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत एका धोकादायक व्यक्तीचा वावर असल्याची माहिती NIA ने मुंबई पोलीसांना दिली होती. या माहितीच्या आधारे संशयित दहशतवादी सरफराज मेमनला (Sarfaraz Memon) पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सरफराजच्या चौकशीसाठी महाराष्ट्र एटीएस इंदूरमध्ये दाखल झाली आहे.

सरफराज मेमन हा चीन आणि पाकिस्तानमधून ट्रेनिंग घेऊन भारतात आल्याची माहिती NIA ने पोलिसांना दिली तसेच, पोलिसांना सतर्क राहण्याचं आवाहनही केलं होते. आता पोलिसांनी संशयित सरफराज मेमनला ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, या कारवाईनंतर आता तपास यंत्रणांकडून कसून चौकशी केली जात आहे. या संशयित दहशतवाद्याच्या चौकशीनंतर याबाबतीत पुढील माहिती समोर येईल.

Exit mobile version