नवी दिल्ली : देशात महागाईने उच्चांक गाठला असतानाच केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलेंडर स्वस्त होणार असल्याची घोषणा केली आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या घरगुती गॅस सिलेंडरला 200 रुपयांची सबसिडी देण्याचा निर्णयही सरकारने घेतल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध पदांसाठी नवीन भरती, 25 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
तसेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत असलेल्या लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर 200 रुपयांची (12 सिलेंडर) सबसिडी देण्यात येणार आहे. या योजनेच्या 9 कोटी लाभार्थ्यांना लाभ होणार आहे.
तसेच पेट्रोलवरचा अबकारी कर 8 रुपये तर डिझेलवरचा अबकारी कर 6 रुपयांनी कमी करत असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली. यामुळे पेट्रोलच्या दरात 9.5 रुपयांची तर डिझेलच्या दरात 7 रुपयांची घट होईल, असं सीतारमण यांनी सांगितलं.
या दिवसापासून होणार पेट्रोल डिझेल स्वस्त ; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय !
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात तब्बल 105 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !