नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. मोदी आडनावाशी संबंधित बदनामी प्रकरणात सुनावलेल्या शिक्षेविरुद्ध राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता ही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी, 13 एप्रिल रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘मोदी आडनाव’ वर विधान केले होते. सुरतच्या मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने 23 मार्च रोजी गुजरातमधील भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी दाखल केलेल्या 2019 प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 499 आणि 500 (फौजदारी मानहानी) अंतर्गत राहुल गांधी यांना दोषी ठरवले आणि त्यांना दोन वर्षांच्या शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांची खासदारकी देखील गेली होती.
या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांनी गुजरात हायकोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. मात्र, राहुल गांधींना कोर्टाकडून कोणाताही दिलासा देण्यात आलेला नाही. राहुल गांधी यांची ही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे कोर्टाच्या या निर्णयामुळे राहुल गांधींची खासदारकी 8 वर्षांसाठी रद्द राहणार आहे.
सुरत कोर्टाने २३ मार्च रोजी दिलेल्या निर्णयानुसार या मानहाणीच्या खटल्यात राहुल गांधी यांना दोषी ठरवण्यात आले होते आणि त्यांना २ वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. यानंतर राहुल गांधी यांच्याकडून गुजरात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली.
दरम्यान, हायकोर्टाने २ मे रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. यानंतर आता निर्णय देण्यात आला आहे. राहुल गांधी यांनी दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळली आहे.
हे ही वाचा :
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुकीचा बिगूल वाजणार?
ऑनलाईन गेम खेळताना प्रेम जडलं, 4 मुलांची आई प्रियकरासाठी थेट पाकिस्तानातून भारतात
ब्रेकिंग : 9 आमदार आणि 3 खासदार निलंबित; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोडी
मोठी बातमी : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार, मनसेकडून प्रस्ताव ?
आदिवासी मजुरावर लघुशंका : भाजप नेत्यास अटक ; घरावर बुलडोझर
ब्रेकिंग : अजित पवारांच्या सरकारमधील सहभागानंतर शिंदे गट ॲक्शन मोडवर, केला “हा” निर्धार
आनंदाची बातमी : गाई पाळा अन् मिळवा तब्बल ‘इतके’ लाख अनुदान; सरकारने सुरू केली ‘ही’ योजना