Thursday, December 12, 2024
HomeNewsकृषी: बारामती येथील कृषी प्रदर्शनाला परराज्यातील हजारो शेतकऱ्यांची भेट; 170 एकरवरील विविध...

कृषी: बारामती येथील कृषी प्रदर्शनाला परराज्यातील हजारो शेतकऱ्यांची भेट; 170 एकरवरील विविध स्टॉलची केली पाहणी

कृषी प्रदर्शनात महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, पंजाब, मध्यप्रदेश, कर्नाटक आदी विविध राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी भेट दिली. 170 एकरवरती असलेले सर्व प्रक्षेत्र शेतकरी शिस्तबद्ध रित्या पाहताना दिसले.

हे शेतकरी विविध भजीपला पिकातील आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक प्लॉट, फुलपिकातील विविध वाण, त्याची लागवड पद्धत, मतिविना शेतीचे प्रयोग, ग्रीनहाऊसमधील पिके, भरडधान्य व त्याचे प्रक्रिया पदार्थ, मत्स्य पालन आदींसह स्टॉलवरील माहिती योग्य रीतीने घेत होते.

विषेश करून डिजिटल टनेल याबद्दल शेतकऱ्यांची उत्सुकता दिसून येत होती. कृत्रिम बुद्धीमतत्तेवर आधरित भविष्यातील शेती कशी असेल याची चाहूल शेतकऱ्यांना लागली असल्याचे जाणवले. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे तसेच शेतीवरील खर्च कमी करण्याचे शास्वत शेतीचे तंत्रज्ञान पाहून त्याची माहिती शेतकरी घेत असल्यचे दिसले.

प्रदर्शनास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असतानाच प्रक्षेत्रावर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार, विश्‍वस्त सुनंदा पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रो. निलेश नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन केल्याची भावना शेतकऱ्यांनी दिली. या प्रदर्शनामध्ये महिला व तरुण शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणत होती.

गेले दोन वर्षे जगभरात करोनामुळे अनेक बंधन होती; परंतु यावर्षी कुठल्याही बंधनाशिवाय सुरू असलेले हे प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांनीही तेवढा चांगला प्रतिसाद दिल्याचे जाणवत आहे. या प्रदर्शनात शेतकरी स्टार्टर्समधील विविध तंत्रज्ञानाची माहिती त्याचबरोबर जनावरांचे प्रदर्शन, मातीविना शेतीचे प्रयोग पाहून शेतकरी शेतकऱ्यांना पुढील शेतीचे चाहूल लागल्याचे जाणवत आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय