Monday, December 23, 2024
Homeजुन्नरजुन्नर : कर्मचाऱ्याकडून बँकेतील 52 लाख रूपये किंमतीच्या सोन्यावर डल्ला

जुन्नर : कर्मचाऱ्याकडून बँकेतील 52 लाख रूपये किंमतीच्या सोन्यावर डल्ला

जुन्नर : जुन्नर मध्ये बँकेच्या कर्मचाऱ्यानेच बँकेतील 104 तोळे सोन्यावर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. बेल्हे (ता.जुन्नर) येथील वैष्णवी मल्टिस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या बँकेतील कर्मचाऱ्यांने डल्ला मारल्याची घटना घडली.

सविस्तर वृत्त असे की, वैष्णवी मल्टिस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या बँकेत नागरिकांनी गहाण आणि तारण ठेवलेल्या 51 लाख 21 हजार रूपये किंमतीच्या 104 तोळे सोन्यावर कर्मचाऱ्यांने डल्ला मारला. यावेळी कर्मचारी असलेल्या विकास खिल्लारी याने बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करुन लॉकरमधून सोने लंपास केले. 

याप्रकरणी आळेफाटा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून विकास खिलारी या बँक कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

जुन्नर : ग्रामपंचायत आंबे – पिंपरवाडी येथे शोषखड्डा मोहीम, नाम फाउंडेशनचे सहकार्य

जुन्नर : निमगिरी येथे शाळा पूर्वतयारी अभियान संपन्न


संबंधित लेख

लोकप्रिय