Thursday, September 19, 2024
HomeNewsआझाद मैदान आशा व गटप्रवर्तकांच्या घोषणांनी दणाणले

आझाद मैदान आशा व गटप्रवर्तकांच्या घोषणांनी दणाणले

मुंबई : आज महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समिती वतीने आझाद मैदान मुंबई येथे प्रचंड मोठे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. राज्य भरातून सर्व जिल्ह्यातील आशा व गट प्रवर्तक सहभागी होत्या. जिल्या जिल्यातून आलेल्या आशा व गट प्रवर्तक नि आपल्या भाषणातून प्रश्न मांडले. दुपारी कृती समितीचे शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत, आरोग्य आयुक्त तुकाराम मुंडे, आरोग्य अभियान संचालक अतंत्रिक सरवदे व अधिकारी सोबत मंत्रालयात चर्चा झाली.

आशा व गटप्रवर्तकांना भाऊबीज भेट संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी विचार विनिमय करण्याचा व त्यांच्या सोबत कृती समितीची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. सदर विषय आर्थिक असल्याने त्वरित निर्णय घेता येत नाही. असे म्हणाले. तसेच गेल्या संप काळात आरोग्य मंत्र्यांनी किमान वेतन बाबत आशा व गट प्रवर्तकांच्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी यशदा मार्फत कमिटी करण्याचे आश्वासन दिले होते. या बाबत फाईल तयार आहे. कार्यवाही केली जाईल असे नमूद केले. गट प्रवर्तक वेतन सुसूत्रीकरण बाबत विस्तृत चर्चा झाली. या बाबत अभ्यास करून भूमिका राज्य सरकारने घ्यावी. व गटप्रवर्तकांवरील अन्याय दूर करावा. असे शिष्टमंडळाने सांगितले आहे. शहरी आशा व गट प्रवर्तकांना प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथे दररोज सह्या करण्याची सक्ती संदर्भात पत्रक काढण्याचे आश्वासन दिले. इतर मागण्या बाबत लेखी उत्तर देऊ ही भूमिका घेतली.



या नंतर कृती समिती पदाधिकारी बैठक घेण्यात आली. बैठकीत वरील भूमिका घेऊन पाठपुरावा करावा. जर भाऊबीज भेट दिली नाही तर भाऊबीज च्या दिवशी मुख्यमंत्र्यांना ओळवण्यासाठी आशा व गटप्रवर्तक जातील. व आमदार खासदार मंत्री महोदय ना राज्यभर आशा व गट प्रवर्तक ओवळण्याचे आंदोलन करून भाऊबीज मागतील असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. याची सर्वानी नोंद घ्यावी असे आवाहन कृती समितीने केले आहे.

शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक कृती समितीचे कॉम्रेड राजू देसले, आनंदी अवघडे, भगवान देशमुख, एम.ए.पाटील, निलेश दातखिले, श्रीमंत घोडके, कॉम्रेड शंकर पुजारी, सुवर्णा थोरात, पुष्पा पाटील, रोहिणी पवार आदी होते.

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय