Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडखेड तालुक्यात आयुष्मान भव अभियान साप्ताहिक आरोग्य मेळावे

खेड तालुक्यात आयुष्मान भव अभियान साप्ताहिक आरोग्य मेळावे

मेळाव्यास उत्साही प्रतिसाद; ४ हजार ५०० वर लोकांचा सहभाग 

आळंदी / अर्जुन मेदनकर : खेड तालुक्यात आयोजित सार्वजनिक आरोग्य विभागावाच्या ( महाराष्ट्र शासन ) महत्वांकांक्षी योजने अंतर्गत आयुष्मान भव आरोग्य सेवेच्या उपक्रमांस १३ सप्टेंबर ला सुरुवात झाली. याच उपक्रमात आयोजित तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यामध्ये आयोजित सप्ताहात मेळाव्यात ४ हजार ५०० वर लाभार्थ्याना आरोग्य मेळाव्यात सहभागी होत मेळावे यशस्वी केले.

असंसर्गजन्य आजारांची तपासणी या मेळाव्यात करण्यात आली. मधुमेह, रक्तदाब कर्करोग, किडनी आजार, यांचे तपासणी, निदान, उपचार व संदर्भ सेवा, आभा कार्ड, आयुष्मान कार्ड नोंदणी व वितरण या सेवा या मेळाव्यात देण्यात आल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांनी सांगितले. 

खेड तालुक्यातील प्रा. आ. केंद्रामध्ये व उपकेंद्रामध्ये उत्साहाच्या वातावरणात आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी लोक प्रतिनिधी औदरच्या सरपंच सुजाता पंडीत मेदगे, वाफगाव सरपंच राजेंद्र टाकळकर, उपसरपंच नंदकुमार सुर्वे, माजी सरपंच उमेश रामणे, कडधेचे विकास संभाजी मंडलिक 

मांजरेवाडी सरपंच अनिताताई मांजरे, निघोजे सरपंच संदीप मोहिते, सीताराम गुजर, दौंडकरवाडी सरपंच निघोजे माजी जि.प सदस्य शीलाताई शिंदे, शेलपिंपळगांव ज्येष्ठ नागरिक अंकुश दौंडकर आदी मान्यवरांनी सहभाग घेतला. पाईट सरपंच मंगल भांगे, अश्विनी रोधळ, गुलाब खेंगले, नारायण आहेरकर, संजय कोळेकर उपस्थित होते. संतोषनगर सरपंच अरुणा कड, टाकळकरवाडी सरपंच सुजाता टाकळकर, कुडे सरपंच गणेश बांगर, संजय शेटे आदी मान्यवर होते. 

तालुक्यातील साप्ताहिक मेळाव्यात ४ हजार ५०० वर लाभार्थीनी सहभाग घेतला. उपसंचालक डॉ. राधा किशन पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांचे मार्गदर्शनाखाली या मेळाव्यांचे यशस्वी आयोजन करण्यात आल्याचे डॉ. इंदिरा परके यांनी सांगितले. खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी या मेळाव्यास शुभेच्छा देत मेळाव्याच्या आयोजनाचे कौतुक केले.

संबंधित लेख

लोकप्रिय