Wednesday, December 18, 2024
Homeजुन्नरJunnar : नितीन राकेचा संघर्षरत्न पुरस्काराने सन्मानित ; त्याग, संघर्ष आणि समर्पणाची...

Junnar : नितीन राकेचा संघर्षरत्न पुरस्काराने सन्मानित ; त्याग, संघर्ष आणि समर्पणाची प्रेरणादायी गाथा

जुन्नर (आनंद कांबळे) : जुन्नर येथील नितीन राकेचा यांना आंतरराष्ट्रीय जैन सोशल ग्रुप्स फेडरेशनच्या महाराष्ट्र रीजन यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या संघर्षरत्न पुरस्कार २०२४ ने सन्मानीत करण्यात आले. (Junnar)

या पुरस्कारासाठी १० पेक्षा जास्त देशांतून व १५० जनांमधून रा केचा यांना निवडण्यात आले. २०१८ पासून आपल्या अर्धांगिनीच्या गंभीर कॅन्सरच्या आजाराशी झुंज देत राकेचा यांनी आपले आयुष्य त्यांच्या उपचारांसाठी समर्पित केले. राकेचा यांच्या पत्नी दिवंगत संगीता यांनीही अभूतपूर्व धैर्य दाखवले.

शारीरिक वेदना सहन करताना आपला आत्मविश्वास बळकट केला. सलग सहा वर्षांच्या अडचणीच्या झळा सोसूनही दोघांच्याही एकल प्रवासाच्या निष्ठा आणि समर्पणाची कहाणी केवळ कुटुंबापुरते मर्यादित राहिली नाही, तर त्यांनी कॅन्सरग्रस्त रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांचे देखील मनोधैर्य वाढवले मार्गदर्शन केले आणि संघर्षाची प्रेरणा दिली.

आंतरराष्ट्रीय जैन सोशल ग्रुप्स फेडरेशन महाराष्ट्र विभागाचे चेअरमन कामेश शाह सचिव दिपक दागा व जयश्री शाह, निता दागा व साधना शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत राकेचा यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

(Junnar)

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : प्रख्यात तबला वादक उस्ताद झाकीर हुसैन यांचे निधन

मोठी बातमी : 39 मंत्र्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, वाचा यादी

धक्कादायक : शस्त्रक्रियेनंतर 43 महिलांना झोपवले जमिनीवर, नागरिकांचा संताप

परभणीतील हिंसाचारानंतर आंबेडकरवादी उच्च शिक्षित तरूणाचा पोलिस कोठडीत मृत्यू, सर्वत्र खळबळ

ब्रेकिंग : जळगाव येथे बस-ट्रॅक्टरचा भीषण अपघात; एक ठार, २१ जखमी

संबंधित लेख

लोकप्रिय