Ajit Pawar NCP : सध्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. एकीकडे महाराष्ट्रात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्या महायुतीतील जागावाटपावर चर्चा सुरू असताना अरुणाचल प्रदेशात भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील (Ajit Pawar NCP) संबंध चांगलेच टोकाला गेल्याचे बघायला मिळत आहे. अजित पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षांवर हल्ला झाला आहे.
अरुणाचल प्रदेशातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्षांवर जीवघेणा हल्ला झाला आहे. अरुणाचल प्रदेशात लिका सय्या हे राष्ट्रवादीचे उमेदवार असून त्यांच्यावर हा हल्ला झाला आहे. हा हल्ला भाजपकडून झाल्याचा आरोप राष्ट्रवादी ((Ajit Pawar NCP) ने केला आहे. आपल्या उमेदवाराला मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादीने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. यामुळे महायुतीतील या दोन प्रमुख पक्षांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अरुणाचलमध्ये राष्ट्रवादी ८ जागा लढवत आहे. त्यातील एक उमेदवार व अरुणाचलचे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष लिका सय्या यांना भाजप उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. रविवारी (७ एप्रिल) ही घडली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना सुरक्षा पुरवली जावी अशी मागणी राष्ट्रवादीचे अरुणाचल प्रदेशचे प्रभारी संजय प्रजापती यांनी निवडणूक आयोगाकडे केली गेली आहे.
लिका सय्या हे नानसई येथील उमेदवार आहेत. सय्या हे नानसई मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. रविवारी प्रचार दौरा सुरू असताना भाजपाच्या उमेदवाराने त्यांना मारहाण केली.
हे ही वाचा :
भरदिवसा पृथ्वीवर होणार तब्बल ४ मिनिट अंधार, वाचा काय आहे कारण !
निवडणूक आणि प्रचार ; राजकीय पक्षांनी घ्यावयाची खबरदारी
मुद्रीत माध्यमाच्या जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण आवश्यक
समाज माध्यमांचा गैरवापर करणाऱ्या ४ जणांना नोटीस, १३ जणांचा शोध सुरू
मोठी बातमी : शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार, ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर
मोठी बातमी : एकनाथ खडसे यांची लवकरच भाजपमध्ये घर वापसी होणार