मुंबई : दंगली घडवण्याच्या प्रयत्नाबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करा अशी मागणी डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या राज्य सचिव प्रीति शेखर यांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, “अजानसाठी मशिदीमध्ये माईक वापरण्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दि २ एप्रिल २०२२ रोजी गुढीपाडवा मेळाव्यात केलेले द्वेषपूर्ण भाषण आणि “मशिदीसमोरच हनुमान चालिसा म्हटले जाईल” अशा प्रकारची धमकी देणे हे नि:संदिग्धपणे गुन्हेगारी कृत्य आहे.
मुंबई शहरात जातीय दंगली घडवण्याच्या या प्रयत्नाबद्दल राज ठाकरे यांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्य कमिटीने केली आहे.
नविन कामगार कायद्यांमुळे ‘कायम कामगार’ ही संकल्पना मोडीत निघेल : डॉ.डी.एल.कराड
नवाब मलिक यांना दिलासा नाहीच, आता ‘या’ तारखे पर्यंत सुनावली कोठडी