Wednesday, April 16, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : सैन्यदलातील अधिकारी व जवानांचे रक्षा बंधनाने स्वागत 

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : देहूरोड येथील संरक्षण दलाच्या डेपोमध्ये सैन्य दलातील अधिकारी व जवान यांचे आधार महिला मंडळ, शाहू नगर, देहूरोड डॉक्टर असोसिएशन सदस्य, विश्व हिंदू परिषद- मातृशक्ती अगरवाल समाज महिला संघटना, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ-महिला विभाग यांच्या वतीने रक्षाबंधन करून स्वागत करण्यात आले. Army officers and soldiers are welcomed with Raksha Bandhan

---Advertisement---

आपल्या कुटुंबापासून शेकडो किलोमीटर दूर देशसेवा बजावत असतात. या सर्व जवानांच्या सोबत आपण नेहमीच असतो. प्रतिनिधिक स्वरूपात काही जवानांसोबत सण-उत्सवही साजरे करतो. देहूरोड येथील आपल्या कुटुंबापासून दूर राहून देश सेवा बजावत असणाऱ्या सैन्य दलातील अधिकारी व जवानांना राख्या पाठवण्यात आल्या. 

Army officers and soldiers are welcomed with Raksha Bandhan

या उपक्रमाची संकल्पना डॉ.रमेश बंसल यांनी राबवली. कार्यक्रमाचे संयोजन भास्कर रिकामे (Brilliant Mind Counselling and Training Center, Chinchwad) यांनी केले.

---Advertisement---

यावेळी सुप्रिया चांदगुडे, दिपाली धानोकर, दिपाली करंजकर, वैदेही जिंजाळे, शोभा जगताप यांच्यासह आधार महिला मंडळातील सर्व सदस्य महिला उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles