Saturday, February 22, 2025

ॲपलचा सर्वांत स्वस्त आयफोन लाँच ; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

iPhone 16e Launched in India : ॲपलच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. ॲपलने iPhone 16e लाँच केला आहे. हा फोन Apple iPhone SE 3 चे अपग्रेडेड मॉडेल असून, कंपनीने नवीन नाव आणि सुधारित फीचर्ससह हा स्मार्टफोन बाजारात आणला आहे.

iPhone 16e चे दमदार फीचर्स

Apple ने iPhone 16e मध्ये अनेक प्रीमियम फीचर्स दिले आहेत. हा फोन iPhone 16 सिरीज मधील आहे आणि यात 6.1-इंचाचा OLED डिस्प्ले, A18 चिपसेट, आणि नवीनतम iOS 18 ऑपरेटिंग सिस्टम मिळणार आहे. हा फोन Apple Intelligence ला सपोर्ट करतो, म्हणजेच ChatGPT ची पॉवर या फोनमध्ये असेल.

कॅमेरा सेटअप: 48MP फ्यूजन कॅमेरा

Apple iPhone 16e चा कॅमेरा हा सर्वात मोठा आकर्षण आहे. 48-मेगापिक्सेलचा सिंगल रिअर कॅमेरा असून, कंपनीने यात 2x टेलिफोटो झूम दिला आहे. साधारणपणे Apple ड्युअल कॅमेरा देत असते, पण 2-इन-1 कॅमेरा सेटअप या फोनमध्ये दिला आहे, ज्यामुळे हा कॅमेरा ड्युअल कॅमेऱ्याइतकाच उत्कृष्ट ठरणार आहे.

अधिक शक्तिशाली बॅटरी

Apple ने या फोनमध्ये नवीन सिलिकॉन तंत्रज्ञानाची बॅटरी दिली आहे, जी एकदा चार्ज केल्यावर iPhone 11 पेक्षा 6 तास अधिक चालेल, तर iPhone SE मालिकेतील फोनपेक्षा 12 तास जास्त बॅटरी बॅकअप देईल.

पाणी आणि धूळ प्रतिरोधक (IP68 रेटिंग)

आयफोन 16e हा IP68 रेटिंगसह येतो, म्हणजेच हा फोन स्प्लॅश, पाणी आणि धुळीपासून सुरक्षित राहणार आहे.

किंमत

ॲपल आयफोन 16e हा Apple iPhone 16 सिरीजमधील सर्वात स्वस्त फोन असणार आहे. यामध्ये 128 जीबी इंटरनल मेमरी असलेल्या फोनची किंमत 59,900 रुपये, तर 512 जीबी मेमरी असलेल्या फोनची किंमत 89,900 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन सध्या फक्त काळा आणि पांढरा अशा दोन रंगांमध्ये आणि मॅट फिनिशमध्ये उपलब्ध आहे.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

हे ही वाचा :

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा

बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश, अनेक वस्तू जप्त, १३ जण अटकेत

LIC ची स्मार्ट पेन्शन योजना ; एकदाच गुंतवणूक करा आणि आजीवन पेन्शन मिळवा!

‘छावा’ चित्रपट 7 दिवस मोफत दाखवला जाणार, वाचा कुठे पाहता येणार ?

महिलांसाठी कॅन्सर प्रतिबंधक लस पाच ते सहा महिन्यांत उपलब्ध होणार

छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट होणार जागतिक वारसास्थळ

Related Articles

- Advertisement -

Latest Articles