Friday, April 4, 2025
---Advertisement---
---Advertisement---

मोठी बातमी: शरद पवार यांना आणखी एक मोठा धक्का, राष्ट्रवादी अजित पवार यांचीच

मुंबई : निवडणुक आयोगाच्या निकालानंतर राष्ट्रवादी पक्ष नाव आणि घड्याळ चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्याचा निर्णय घेतला. यानंतर आज शरद पवार यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर राष्ट्रवादी आमदार अपात्र संदर्भात निकाल दिला.

---Advertisement---

राहुल नार्वेकर यांनी निकाल देताना राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष (NCP) कोण हे मी ठरवू शकत नाही. विधीमंडळ पक्षात बहुमत कुणाचं हा एकमेव निकष महत्त्वाचं आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांना दिला आहे. अजित पवार गटाला ४१ आमदारांचं समर्थन असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस हा मूळ पक्ष अजित पवारांचा असल्याचा निर्णय नार्वेकर यांनी दिला. म्हणजेच, अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचे अध्यक्षांनी म्हटले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा हे ठरवताना विधिमंडळ बहुमाताचा विचार करावा लागला. 53 पैकी 41 आमदार अजित पवार यांच्याकडे आहे. हे बहुमत शरद पवार गटाने नाकारले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचाच आहे, असं राहुल नार्वेकर यांनी निकाल देताना सांगितलं. त्यामुळे शरद पवार विरुद्ध अजित पवार ही पक्षाची लढाई अजितदादांनी जिंकली आहे. या निकालाचा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

---Advertisement---

अध्यक्षपदाची निवड घटनेला धरुन नाही, असा दावा दोन्ही गटाकडून कऱण्यात आला. 29 जून 2023 पर्यंत शरद पवार यांच्या अध्यक्षपदाला आव्हान नव्हतं. पण 30 जून 2023 रोजी दोन जणांकडून अध्यक्ष असल्याचा दावा करण्यात आला.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने अलीकडेच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षच मूळ राष्ट्रवादी असल्याचा निकाल दिला होता.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles