Tuesday, December 3, 2024
Homeताज्या बातम्याproject victims : प्रकल्पग्रस्तांना अनियमितरित्या जमीन वाटपबाबत सरकारचा मोठा निर्णय

project victims : प्रकल्पग्रस्तांना अनियमितरित्या जमीन वाटपबाबत सरकारचा मोठा निर्णय

मुंबई, दि. 5 : शासनाने ‘आधी पुनर्वसन मग धरण’ हा कायदा पारित केला आहे. याच कायद्यानुसार सध्या प्रकल्पग्रस्तांचे (project victims) आधी पुनर्वसन करण्यात येत आहे. मात्र कायदा येण्यापूर्वी राज्यात काही प्रकल्प झाले आहेत. या प्रकल्पांबाबत जमीन अधिग्रहीत केलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे. सोलापूर जिल्ह्यातील उजनी, सातारा जिल्ह्यातील कोयना प्रकल्पग्रस्तांना अन्य ठिकाणी शासकीय जमिनी देण्यात आल्या आहेत. ज्यांची प्रकल्पात जमीन नाही अशा अनियमितरित्या पर्यायी शासकीय जमिनींचे वाटप केल्यासंदर्भात उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्यात येत असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

याबाबत सदस्य समाधान अवताडे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील, यशोमती ठाकूर, दिलीप मोहिते – पाटील, महेश शिंदे यांनी उपप्रश्न विचारले.

मंत्री पाटील म्हणाले की, प्रकल्पग्रस्तांना (project victims) पर्यायी जमीन वाटपाबाबत अनियमितता झाली असल्याचे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आले. या संदर्भात चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल मा. उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून त्यानंतर कार्यवाही करण्यात येईल. प्रकल्पात भोगवटादार 1 ची जमीन गेली असल्यास प्रकल्पग्रस्तास भोगवटादार 1 ची जमीनच देण्याचा शासनाचा नियम आहे.

Project victims

शासनाने अधिग्रहीत केलेली जमीन प्रकल्पग्रस्तांना (project victims) वाटप करण्यात येते. ही जमीन ज्या ठिकाणी आहे, तिथेच देण्यात येते. कोयना प्रकल्पाबाबत अनियमितपणे जमीन वाटपाबाबत कार्यवाही करण्यासाठी सातारा जिल्हाधिकारी यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वर्ग 2 आणि वर्ग 3 च्या जमीनीबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल. प्रकल्पग्रस्तांची दुबार जमीन घेतली गेली असल्यास चौकशी करून त्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. पात्र प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यात येईल, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

जगातील पहिली CNG बाईक प्रदूषणमुक्त भारत ध्येय साध्य करेल – नितीन गडकरी

नाणेघाट : इतिहासाची आणि नैसर्गिक सौंदर्याची संगमभूमी

मोठी भरती : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत भरती; पगार 64480 पर्यंत

ब्रेकिंग : मुख्याध्यापक नियुक्तीसाठी पटसंख्येचा निकष बदलणार ?

गावठी दारू तयार करणाऱ्या १० हातभट्ट्यांवर छापा; २ लाख १७ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त

AIASL मार्फत विविध पदांच्या 3256 जागांसाठी मेगा भरती

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील झिका विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक नियमावली जाहीर

धक्कादायक! अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने कॉलेजच्या टॉयलेटमध्ये दिला बाळाला जन्म

संबंधित लेख

लोकप्रिय