Wednesday, December 18, 2024
Homeराष्ट्रीयAmit Shah : अमित शाह यांच्या आंबेडकरांच्या विधानावरून संसदेत गोंधळ

Amit Shah : अमित शाह यांच्या आंबेडकरांच्या विधानावरून संसदेत गोंधळ

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ झाला. काँग्रेससह विरोधी पक्षांनी अमित शाह यांच्या विधानाचा तीव्र विरोध केला असून, त्यांच्या माफीची मागणी जोरदारपणे केली आहे.

संसदेचं कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी संसदेच्या बाहेर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो हातात घेत निदर्शने केली. “अमित शाह माफी मांगो” आणि “जयभीम”च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. (Amit Shah)

कामकाज सुरू होताच विरोधकांनी दोन्ही सभागृहांत अमित शाह यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यांनी अमित शाह यांना विधानासाठी माफी मागण्याची मागणी केली. त्यामुळे सभागृहात गोंधळ उफाळला. अखेर, लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी अमित शाह यांच्या विधानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत म्हटले आहे की, अमित शाह यांनी अत्यंत घृणास्पद गोष्ट केली आहे. यावरून भाजप आणि आरएसएसच्या नेत्यांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांबद्दल प्रचंड द्वेष असल्याचे दिसून येते. द्वेष इतका आहे की त्यांच्या नावानेही त्यांना चीड येते. हे तेच लोक आहेत ज्यांचे पूर्वज बाबासाहेबांचे पुतळे जाळत असत, जे स्वतः बाबासाहेबांनी दिलेले संविधान बदलण्याच्या गप्पा मारत असत. अमित शहा यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी जयराम रमेश यांनी केली आहे.

अमित शाह यांनी विरोधकांवर टीका करताना म्हटले होते, “आंबेडकर… आंबेडकर म्हणायची आता एक फॅशन झाली आहे. एवढं जर देवाचं नाव घेतलं असतं तर सात जन्मापर्यंत स्वर्ग मिळाला असता.”

या विधानावरून विरोधकांनी आक्षेप घेतला असून, हा डॉ. आंबेडकरांचा अपमान असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांनी अमित शाह यांना माफी मागण्याची मागणी केली आहे.

Amit Shah

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

सर्वात मोठी भरती : भारतीय स्टेट बँक अंतर्गत तब्बल 13,735 जागांसाठी मेगा भरती

जुन्नर बस स्थानकात पिकअप वाहनाचे धोकादायक स्टंट करणारा पोलिसांच्या ताब्यात

मोठी बातमी : प्रख्यात तबला वादक उस्ताद झाकीर हुसैन यांचे निधन

मोठी बातमी : 39 मंत्र्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, वाचा यादी

धक्कादायक : शस्त्रक्रियेनंतर 43 महिलांना झोपवले जमिनीवर, नागरिकांचा संताप

परभणीतील हिंसाचारानंतर आंबेडकरवादी उच्च शिक्षित तरूणाचा पोलिस कोठडीत मृत्यू, सर्वत्र खळबळ

ब्रेकिंग : जळगाव येथे बस-ट्रॅक्टरचा भीषण अपघात; एक ठार, २१ जखमी

संबंधित लेख

लोकप्रिय