Photo : Alt News |
मुंबई : रशिया आणि युक्रेन यांच्यात सध्या युध्द सुरू आहे. रशियाने युक्रेनच्या काही शहरांवर बाँम्ब हल्ले केले आहेत, या युध्दाला जगभरातील मीडिया कव्हर करत आहे. मात्र, भारतातील काही माध्यमे फेक व्हिडिओ वापरत असल्याचे समोर आले आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील या युद्धाचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत, या युध्दादरम्यान, भारतातील काही माध्यमांकडून फेक फुटेज अर्थात जुने फुटेज प्रसारित करून युक्रेनवरील हल्ल्याचे भासविले जात आहे.
रशिया युक्रेनच्या युध्दाचा सोने-चांदीवर परिणाम, “इतक्या” वाढल्या किंमती
#RussiaUkraineCrisis: Ukraine says 5 Russian planes, 1 helicopter shot down in Luhansk#PutinOnTheMarch #Russia #Ukraine pic.twitter.com/yl1SR70lhc
— TIMES NOW (@TimesNow) February 24, 2022
फेक न्युजच्या विरोधात काम करणाऱ्या अल्ट न्यूजने रिपब्लिक वर्ल्ड, न्यूज 24, झी न्यूज, टाईम्स नाऊने, न्यूजएक्स आणि जन कि बात अशा काही प्रतिष्ठीत मीडिया संस्थानांचा पर्दाफाश केला आहे. यूट्यूबवर 4 मे, 2020 रोजी अपलोड झालेले व्हिडिओ भारतातील काही माध्यमांनी वापरले आहेत.
credit : alt News |
9 मे 1945 रोजी नाझी जर्मनीच्या आत्मसमर्पणाच्या स्मरणार्थ रशिया दरवर्षी 9 मे रोजी विजय दिवस साजरा करतो. युक्रेनवर हल्ला म्हणून भारतीय मीडियाने चालविलेले व्हिडिओ जर्मन मीडिया रिपोर्ट्स आणि यूट्यूबवर आहेत. तसेच, एक व्हिडिओ मॉस्को टाईम्सने देखील 4 मे, 2020 रोजी अपलोड केलेला आहे. त्यामुळे भारतातील काही माध्यमांकडून जुने व्हिडिओ वापरल्याचे उघड झाले आहे.
रशिया युक्रेन यांच्यात युध्द सुरू, भारतीय शेअर बाजारात सर्वात मोठी घसरण
credit : alt News |
सोशल मीडिया यूज़र्स सहित ज़ी न्यूज़ और न्यूज़ 24 ने एक वीडियो शेयर करते हुए दावा किया कि ये यूक्रेन में उतर रहे रूसी पैराट्रूपर्स का दृश्य है. जबकि ये वीडियो कम से कम 2016 से इन्टरनेट पर मौजूद है. पढ़िये #AltNewsFactCheck | @Pooja_Chaudhuri https://t.co/ENMySCdzmT
— Alt News Hindi (@AltNewsHindi) February 24, 2022
प्रत्येक जोडप्याने सकाळी उठल्याबरोबर या चार गोष्टी करा; प्रेम होणार नाही कधीच कमी