Saturday, October 5, 2024
Homeराज्यरशिया युक्रेनच्या युध्दासंदर्भात भारतातील काही मीडियाकडून फेक व्हिडिओचा वापर, अल्ट न्यूजने केला...

रशिया युक्रेनच्या युध्दासंदर्भात भारतातील काही मीडियाकडून फेक व्हिडिओचा वापर, अल्ट न्यूजने केला पर्दाफाश

Photo : Alt News

मुंबई : रशिया आणि युक्रेन यांच्यात सध्या युध्द सुरू आहे. रशियाने  युक्रेनच्या काही शहरांवर बाँम्ब हल्ले केले आहेत, या युध्दाला जगभरातील मीडिया कव्हर करत आहे. मात्र, भारतातील काही माध्यमे फेक व्हिडिओ वापरत असल्याचे समोर आले आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील या युद्धाचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत, या युध्दादरम्यान, भारतातील काही माध्यमांकडून फेक फुटेज अर्थात जुने फुटेज प्रसारित करून युक्रेनवरील हल्ल्याचे भासविले जात आहे.

रशिया युक्रेनच्या युध्दाचा सोने-चांदीवर परिणाम, “इतक्या” वाढल्या किंमती

फेक न्युजच्या विरोधात काम करणाऱ्या अल्ट न्यूजने रिपब्लिक वर्ल्ड, न्यूज 24, झी न्यूज, टाईम्स नाऊने, न्यूजएक्स आणि जन कि बात अशा काही प्रतिष्ठीत मीडिया संस्थानांचा पर्दाफाश केला आहे. यूट्यूबवर 4 मे, 2020 रोजी अपलोड झालेले व्हिडिओ भारतातील काही माध्यमांनी वापरले आहेत.

credit : alt News

9 मे 1945 रोजी नाझी जर्मनीच्या आत्मसमर्पणाच्या स्मरणार्थ रशिया दरवर्षी 9 मे रोजी विजय दिवस साजरा करतो. युक्रेनवर हल्ला म्हणून भारतीय मीडियाने चालविलेले व्हिडिओ जर्मन मीडिया रिपोर्ट्स आणि यूट्यूबवर आहेत. तसेच, एक व्हिडिओ मॉस्को टाईम्सने देखील 4 मे, 2020 रोजी अपलोड केलेला आहे. त्यामुळे भारतातील काही माध्यमांकडून जुने व्हिडिओ वापरल्याचे उघड झाले आहे.

रशिया युक्रेन यांच्यात युध्द सुरू, भारतीय शेअर बाजारात सर्वात मोठी घसरण

credit : alt News

प्रत्येक जोडप्याने सकाळी उठल्याबरोबर या चार गोष्टी करा; प्रेम होणार नाही कधीच कमी

 

संबंधित लेख

लोकप्रिय