Monday, December 23, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडमतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच माझा अजेंडा - राहुल कलाटे

मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच माझा अजेंडा – राहुल कलाटे

पिंपरी चिंचवड : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील कचरा व्यवस्थापन, पाणीप्रश्न, सार्वजनिक वाहतुकीचे नियोजन, पवनामाईचे पुनरुज्जीवन यासह मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच माझा अजेंडा असल्याचे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी सांगितले. उच्चशिक्षित असलेले कलाटे यांचे मतदारसंघाबाबतचे सर्वांगिण विकासाचे ‘व्हिजन’ मतदारांना भावत आहे. त्यामुळे राहुलदादालाच आमदार करणार अशा प्रतिक्रिया मतदार देतात.

चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीला राहुल कलाटे शिट्टी चिन्हावर सामोरे जात आहेत. कलाटे नागरिकांच्या वैयक्तीक गाठीभेटी घेत आहेत. त्यांच्या पदयात्रांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ठिकठिकाणी त्यांचे मोठ्या उत्साहात, जल्लोषात स्वागत केले जाते. राहुल कलाटे नागरिकांसमोर चिंचवडच्या विकासाचे ‘व्हिजन’ मांडतात. कलाटे यांनी दुरदृष्टी ठेवून मांडलेले ‘व्हिजन’ मतदारांना भावत आहे. कलाटे यांच्याकडे चिंचवडचा सर्वांगीण विकास करण्याची धमक, ताकद, क्षमता असल्याचे मतदार सांगतात. कलाटे यांना मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

राज्यातील सर्वात मोठा चिंचवड विधानसभा मतदारसंघ आहे. मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून म्हणजेच 2009 पासून चिंचवडचा सर्वांगीण विकास झाला नाही. काही टप्प्यातच कामे झालेली दिसतात. त्यामुळे विकास कामात भेदभाव न करणारा, चिंचवडचा सर्वांगीण विकास करणारा, उच्चशिक्षित, प्रश्नांची जाण असनारा राहुल कलाटे यांच्यासारखा आमदार चिंचवडच्या जनतेला हवा आहे. कलाटे यांच्याकडे आशादायक नेतृत्व म्हणून मतदार बघतात. आता उच्चशिक्षित कलाटे यांनाच चिंचवडचा आमदार करण्याचा निर्धार मतदारांनी केला आहे.

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय