Friday, November 22, 2024
Homeराज्यविद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ तारखेपासून लागणार उन्हाळ्याच्या सुट्टी

विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ तारखेपासून लागणार उन्हाळ्याच्या सुट्टी

मुंबई : महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यातील शाळांना 2 मे 2023 पासून उन्हाळ्याच्या सुट्टी लागणार आहे.

विद्यार्थी उन्हाळ्याच्या सुट्टीची आतुरतेने वाट पाहत असतात. आता शिक्षण विभागाने उन्हाळी सुट्ट्यांसंदर्भात एक पत्रक जारी केले आहे. शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनेनुसार 2022- 2023 या शैक्षणिक वर्षाच्या सर्व परीक्षा 02 मे पर्यंत पूर्ण होतील. त्यामुळे  2 मे पासून ते 11 जून पर्यंत उन्हाळी सुट्टी असणार आहे. यासोबतच इयत्ता पहिली ते नववी आणि इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल शाळांना 30 एप्रिल रोजी किंवा त्यानंतर उन्हाळी सुट्टीच्या काळात जाहीर करता येणार आहे. याबाबत शिक्षण संचालक यांनी‎ पत्र काढले आहे.

दरम्यान, नवीन शैक्षणिक सत्र हे १२ जून रोजी शाळा‎ सुरू होणार आहेत. तर विदर्भातील तापमान पाहता या‎ ठिकाणी २६ जूनपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय‎ शिक्षण विभागाने घेतला आहे.

तसेच, शैक्षणिक वर्षातील एकूण सुट्ट्या या 76 पेक्षा अधिक होणार नाही याची दक्षता शिक्षण अधिकाऱ्यांनी द्यावी, असेही परिपत्रकात म्हटले आहे. शिक्षण संचालनालयाने हे परिपत्रक काढून विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी, माध्यमिक आणि शिक्षण निरीक्षक यांना आदेश दिले आहेत.

संबंधित लेख

लोकप्रिय