Wednesday, January 15, 2025
Homeताज्या बातम्याजागतिक आरोग्य संघटनेचा खळबळजनक खुलासा.. जगातील दर ६ पैकी १ व्यक्ती नपुंसक

जागतिक आरोग्य संघटनेचा खळबळजनक खुलासा.. जगातील दर ६ पैकी १ व्यक्ती नपुंसक

जिनिव्हा : WHO ने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीच्या आधारे, जगातील 17.5% लोकसंख्या वंध्यत्वाच्या (Infertility) समस्येने ग्रस्त आहे. श्रीमंत देशांमध्ये हा आकडा 17.8% आहे, तर गरीब देशांमध्ये 16.5% लोक आयुष्यभर वंध्यत्वाला बळी पडतात.

जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेली ही आकडेवारी 1990 ते 2021 या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या 133 वेगवेगळ्या अभ्यासांच्या विश्लेषणाच्या आधारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यापैकी 66 अभ्यास पती-पत्नीवर करण्यात आले, तर 53 अभ्यास अशा लोकांवर करण्यात आले जे विवाहित नाहीत आणि त्यांच्या जोडीदारांसोबत राहतात. असे 11 अभ्यास होते ज्यांच्या वैवाहिक स्थितीबद्दलची माहिती उघड झाली नाही.

या अभ्यासाच्या परिणामांनुसार, वंध्यत्वाची समस्या पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त दिसून आली. मात्र या अभ्यासात समाविष्ट असलेल्या एकूण लोकांमध्ये महिलांची संख्या जास्त होती. या अभ्यासात सहभागी झालेले बहुतेक लोक युरोपमधील होते, तेथून सुमारे 35% लोक सहभागी झाले होते, तर एकूण अभ्यासापैकी 9% दक्षिण आशियातील होते, ज्यामध्ये भारताचा देखील समावेश होतो.

डब्ल्यूएचओच्या अभ्यासानुसार, मूल-बाळ होण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी भारतात सर्वाधिक खर्च केला जातो.भारतात एआरटी सायकलची किंमत 18592 डॉलर्स म्हणजे सुमारे 15 लाख 30 हजार रुपये इतकी आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय