मी सेवेकरी फाऊंडेशनचा सामाजिक धार्मिक उपक्रमाचे तालुक्यात स्वागत (alandi)
आळंदी / अनिराज मेदनकर : मी सेवेकरी फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष सुधीर मुंगसे यांनी राबवलेल्या पंढरपूर देवदर्शन यात्रेच्या माध्यमातून खेड तालुक्यातील जवळपास पंधरा हजारांहून अधिक भाविकांनी विठूरायाचे दर्शन घेतले. यात लहानगयांपासून वयोवृद्ध महिला पुरुष वारकरी भाविकांचा समावेश होता. (alandi)
राज्यातील आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन वैष्णवांचा मेळा लाडक्या विठूरायाच्या भेटीसाठी देहू-आळंदी हुन दिंड्या पताकांसह पंढरपूरकडे पायी निघतो. पण अनेकांना काही कारणांनी पायी वारी करता येत नाही. अश्या विठ्ठल भक्तांसाठी सुधीर मुंगसे यांनी मी सेवेकरी फाऊंडेशनच्या माध्यमातून ‘मोफत पंढरपूर यात्रेचे’ आयोजन हरिनाम गजरात घडविले. (alandi)
या यात्रेच्या माध्यमातून खेड तालुक्यातील विविध वयोगटातील महिला आणि पुरुषांना पंढरपूरला जाऊन आपल्या विठुरायाचे दर्शन घेता आले. सुधीर मुंगसे म्हणाले, पंढरपूरचा पांडुरंग हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे.
आषाढी वारीच्या निमित्ताने लाखो वारकरी पंढरपूरला निघतात. पण, अनेकांना मनोमन वारीला जाण्याची इच्छा असली तरी काही कारणांमुळे शक्य होत नाही. त्यामुळेच आम्ही हा यात्रेचा उपक्रम राबवला. जेणे करुन एक दिवस का होईना आषाढी वारीच्या काळात पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेता येईल. (alandi)
या उपक्रमाच्या माध्यमातून तालुक्यातील पंधरा हजाराहून अधिक लोकांना विठ्ठलाचे दर्शन घडवण्याचे भाग्य मला लाभले. यात मी समाधानी आहे. असेच कार्य आपल्या हातून यापुढील काळात घडावे यासाठी पांडुरंगरायांस त्यांनी साकडे घातले.
हेही वाचा :
अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील नागरिकांना दुधाळ जनावरे गट वाटपाची योजना
महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या जूनमधील सोडतीचा निकाल जाहीर
गर्भवती महिलेच्या अंत्यसंस्कारानंतर राखेत सापडली धक्कादायक वस्तू, सर्वत्र खळबळ
मोठी बातमी : आता वारकऱ्यांना मिळणार पेन्शन, वारकरी महामंडळाची स्थापना