Friday, May 23, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : डासउत्पत्ती ठिकाणे व भंगार साहित्याची विल्हेवाट लावा, शहर डेंग्यू मुक्त करा – नाना काटे

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : शहरात झपाट्याने वाढणाऱ्या डेंग्यू आणि कीटकजन्य आजार वाढत आहेत. बाबत योग्य उपयोजना तसेच डेंगूमुक्त शहर करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी आयुक्त शेखर सिंह यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. (pcmc)

पावसाळा सुरू आहे शहरात साथीच्या आजाराने रुग्ण वाढत असून अशातच शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या देखील वाढत असून याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शहरात अनेक सार्वजनिक, वैयक्तिक ठिकाणी, झाडाची कुंडी, पाळीव प्राण्यांसाठी ठेवण्यात आलेली भांडी, टायर, मोकळे डब्बे, भंगार साहित्य, आदी ठिकाणी पाणी साठवले जातेय, त्या साठवलेल्या पाण्यात डेंग्यू डासउत्पत्ती वाढत आहे.

यावर दैनंदिन स्वच्छता अभियान खास करून राबवण्याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत आहे. या हलगर्जीपणामुळे शहरातील डेंग्यू संख्या झपाट्याने वाढत आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना कमी पडत असून परिणामी आपल्या आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत आहे. (pcmc)

पर्यायी रुग्णांना उपचारासाठी महापालिकेच्या रुग्णालयात बेड, व औषध उपलब्ध होत नसून नागरिकांना या नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे, तसेच शहरातील महापालिकेच्या रुग्णालयात औषधाचा देखील तुटवडा भासत आहे.

---Advertisement---

हि खूप गंभीर बाब असून, पाण्याची साठवणूक करून योग्य ती काळजी न करणाऱ्या व नियम न पाळणाऱ्यावर योग ती कडक कारवाई कारवाई करण्यात यावी. (pcmc)

दैनंदिन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा

शहरातील डेंगू बाधित रुग्णाची वाढती संख्या पाहता, आपल्या आरोग्य यंत्रणेची परीस्थितीचे व आजाराचे गांभीर्य पाहता यावर लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात व शहरातील डेंगू या आजारावर उपचार करण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्याचे आदेश देण्यात यावे. (pcmc)

तसेच विविध आस्थापनांची तपासणी करून डासोत्पत्ती स्थळे नष्ट करण्याचे सूचित करण्यात यावे तसेच या डेंगू बाधित रुग्णांवर शहरातील महापालिकेच्या रुग्णालयात मोफत उपचार करून देण्यात यावेत, अशी मागणी नाना काटे यांनी केली आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

---Advertisement---

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा, केल्या ‘या’ घोषणा

अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील नागरिकांना दुधाळ जनावरे गट वाटपाची योजना

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या जूनमधील सोडतीचा निकाल जाहीर

गर्भवती महिलेच्या अंत्यसंस्कारानंतर राखेत सापडली धक्कादायक वस्तू, सर्वत्र खळबळ

मोठी बातमी : आता वारकऱ्यांना मिळणार पेन्शन, वारकरी महामंडळाची स्थापना

मोठी बातमी : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट, शाळांना सुट्टी तर नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles