Monday, December 23, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडALANDI : ज्ञानेश्वर महाराज मंदिरात रक्षाबंधन दिनी मुक्ताईची ज्ञानदेवांना राखी अर्पण

ALANDI : ज्ञानेश्वर महाराज मंदिरात रक्षाबंधन दिनी मुक्ताईची ज्ञानदेवांना राखी अर्पण

आळंदी / अर्जुन मेदनकर : येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात रक्षाबंधन दिनी श्री संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर जिल्हा जळगाव श्री आदिशक्ती मुक्ताबाई संस्थानच्या वतीने पाठविलेली राखी श्रींचे समाधीला स्पर्श करीत श्री संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष रविंद्र भैय्यासाहेब पाटील, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी आळंदी विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथजी यांचे हस्ते अर्पण करण्यात आली. (ALANDI)

श्री संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर जिल्हा जळगाव यांचे वतीने मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष रविंद्र भैय्यासाहेब पाटील, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी आळंदी विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथजी यांचे प्रमुख उपस्थितीत श्रींना रक्षा बंधन दिनी श्रींचे संजीवन समाधीस स्पर्शीत करून राखी अर्पण करण्यात आली.

या प्रसंगी जयंतराव महल्ले, संदीप दादा पाटील, अंकिता पाटील, महामंडलेश्वर जनार्दन हरि चैतन्यजी महाराज, गजानन महाराज लाहुडकर, विशाल महाराज खोले, विचारसागर महाराज लाहुडकर,
संतोष चैतन्यजी महाराज, राजेश पाटील, श्रीकांत महाजन, आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर, विशाल महाराज खोले आदी मान्यवर, वारकरी भावीक यांचे उपस्थितीत माऊली मंदिरात श्रीनां राखी अर्पण करीत भारतीय संस्कृती जोपासत रक्षा बंधन साजरी करण्यात आली. यावेळी वाघोलीतील गाडे परिवार तर्फे देखील श्रीनां रक्षाबंधन दिना निमित्त सोन्याची राखी अर्पण करण्यात आली. (ALANDI)

यावेळी दर्शनास भाविकांनी मंदिरात तसेच महाद्वारात गर्दी केली. आळंदी मंदिर परिसरात भाविकांसह भाविक व पंचक्रोशीतील वाहनाची प्रचंड गर्दी होती. श्रावणी सोमवार, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा असा त्रिवेणी संगम साधत भाविकांनी मंदिरात श्रींचे रांगा लावून दर्शनास गर्दी केली होती.

आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी रक्षाबंधन दिनी आलेल्या सन्माननीय राख्याची माहिती दिली. मुक्ताईची श्रींसाठीची राखी देवस्थानच्या परंपरागत नियोजन प्रमाणे श्रीनां अर्पण करण्यात आली. रक्षाबंधन दिनाची येथील परंपरा श्री आदिशक्ती मुक्ताबाई संस्थानच्या वतीने पाटील महाराज आणि सर्व संबंधित संस्थान यांनी श्रीनां राखी पाठवीत परंपरा कायम ठेवली. यावेळी आदिशक्ती मुक्ताई यांच्याकडून श्रीक्षेत्र आळंदी, त्र्यंबकेश्‍वर आणि सासवड येथे ही श्रीनां राखी अर्पण करण्यास पोच करण्यात आली.

आळंदी देवस्थानचे वतीने श्री आदिशक्ती मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष आणि मान्यवर यांचा सन्मान आळंदी देवस्थानचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथजी यांचे हस्ते श्रीफळ प्रसाद भेट देऊन सत्कार करण्यात आला. आळंदीतील माऊली मंदिरासह परिसरातील घराघरांमध्ये रक्षाबंधन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुक्ताई संस्थान तर्फे पाटील यांनी सपत्नीक श्रींची पुजा करीत मुक्ताईची ज्ञानदा साठीची राखी समाधीस स्पर्श करीत अर्पण केली. आळंदी संस्थान चे वतीने मुक्ताईस साडी चोळी सुपूर्द करण्यात आली.

येथील श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेत देखील आपल्या आई, वडील आणि बहीण , भाऊ तसेच कुटुंबीय यांचे पासून दूर राहून आळंदीत शालेय शिक्षणा सह अध्यात्मिक शिक्षण घेणास निवासी राहत असलेल्या मुलं, मुलींसाठी रक्षा बंधन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी संस्थेत रक्षा बंधन दिना निमित्त मुलांना राखी बांधून सण साजरा केला. यावेळी संस्थेचे वतीने सर्व मुलं-मुलींना सुग्रास स्नेहभोजन देण्यात आले. परंपरांचे पालन करीत आळंदी पंचक्रोशीत रक्षा बंधन घराघरांत साजरे करण्यात आले. या प्रसंगी मोहन महाराज शिंदे, सचिन महाराज शिंदे आदी उपस्थित होते. परंपरांचे पालन करीत आळंदी पंचक्रोशीत रक्षा बंधन घराघरांत साजरे करण्यात आले.

संबंधित लेख

लोकप्रिय