Friday, October 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडALANDI : कोयाळी शाळेत ओळख श्री ज्ञानेश्वरीची उपक्रमास प्रारंभ

ALANDI : कोयाळी शाळेत ओळख श्री ज्ञानेश्वरीची उपक्रमास प्रारंभ

हरिनाम गजरात मुलांना हरिपाठाचे वाटप (ALANDI)

आळंदी / अर्जुन मेदनकर : येथील कोयाळी तर्फे चाकण पुणे जिल्हा परिषद शाळेत शालेय मुलांसाठी असलेल्या ओळख श्री ज्ञानेश्वरीची ” या संस्कारक्षम उपक्रमाचा प्रारंभ हरिनाम गजरात झाला. यावेळी सर्व मुलांना हरिपाठाचे वाटप करण्यात आले. (ALANDI)

या वेळी श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, मुख्याध्यापक राहुल शेलार, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, समन्वयक कैलास आव्हाळे मुख्याध्यापक राहुल शेलार, रविंद्र पवार, अर्चना सुतार, निवृत्ती वाळुंज, विनायक तावरे, वर्षा जायभाये, सुनिता हिले आदी उपस्थित होते.

प्रशालेचे वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत पुष्प व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

या वर्षी श्री संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव जन्मोत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्त शाळेला श्री ज्ञानेश्वर महाराज यांची प्रतिमा, श्री ज्ञानेश्वरी सार्थ प्रत आणि श्री ज्ञानेश्वरी पारायण प्रति तसेच उपस्थित सर्व शालेय मुलांना हरिपाठ पुस्तकांचे वाटप श्री संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी ओळख श्री ज्ञानेश्वरी ची या उपक्रमात कार्यक्रमाची सविस्तर माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांनी देत शालेय मुलांसह उपस्थितांशी सुसंवाद साधला. या उपक्रमाची गरज यावर त्यांनी विवेचन दिले. मुले सुसंस्कृत आणि संस्कारक्षम व्हावीत यासाठी शाळा आणि ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवार या माध्यमातून श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी, ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती आणि पत्रकार संघ यांचे माध्यमातून हा उपक्रम राबविला जात असून माऊली हे सेवाकार्य करून घेत असल्याचे सांगत प्रकाश काळे म्हणाले, आमचे यात काहीही योगदान नाही. माऊलींचे साहित्य सर्वसामान्यांन पर्यंत घेऊन जाण्याचे उपक्रमात सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

शालेय मुले आणि उपस्थितांना विविध दाखले देत त्यांनी आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या वाणीतून मार्गदर्शन करीत संवाद साधला. यावेळी माऊलींचे शब्दाचा डबा अर्थात हरिपाठ, ज्ञानेश्वरी आदी साहित्याचा असा शब्दाचा डबा ही मिठाई आणि आईने घरून दिलेला धष्ट्पुष्ठ होण्यासाठी घरचा अन्नाचा डबा सेवन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी मुलांशी संवाद साधत मुलांनीही मोठा प्रतिसाद देत केलेले आवाहन जय हरी माऊली म्हणत स्वीकारले.

मुख्याध्यापक राहुल शेलार यांनी शाळेत ओळख ज्ञानेश्वरी हा उपक्रम सुरू केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, दर्जेदार शिक्षण देत मुले संस्कारक्षम घडावीत यासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. शालेय अभ्यासक्रमासह मुलांना अध्यात्मिक बैठक या उपक्रमातून मिळणार असल्याने ओळख श्री ज्ञानेश्वरीची हा उपक्रम यशस्वी करू अशी ग्वाही शेलार यांनी दिली.

मुलांना दर्जेदार शिक्षण देऊन मुलांचा सर्वांगीण विकास साधण्याचा यशस्वी प्रयत्न केला जात आहे. संघाचे अध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविक राहुल शेलार यांनी केले. सुत्रसंचलन रविंद्र पवार यांनी केले. आभार अर्चना सुतार यांनी मानले.

पसायदान गायनाने उपक्रमाची सांगता हरिनाम गजरात झाली.

संबंधित लेख

लोकप्रिय