स्नेहवनास भेट देण्याचे आवाहन Alandi
आळंदी / अर्जुन मेदनकर : येथील कोयाळीतील वैभव असलेले स्नेहवन मध्ये अनेक वर्षांपासून अनाथ तसेच आत्महत्या केलेल्या शेतक-यांचे मुले, मुली शिक्षणा पासून वंचित राहू नये यासाठी शालेय शिक्षण समवेत व्यावसायिक, तसेच व्यक्तिमत्व विकासाचे शिक्षण दिले जात आहे. येथील कोयाळी स्नेहवनात शालेय मुलांस अन्नदान वाटप करण्यात आले. ALANDI
या स्नेहवनातील शालेय मुलां समवेत शेतकरी कुणबी मराठा संघाचे संस्थापक अध्यक्ष अप्पासाहेब कड यांनी त्यांचे वडील कै. हरिभाऊ भिमाजी कड यांच्या १० वे पुण्यस्मरण दिना निमित्त हृदयस्पर्शी वातावरणात शालेय मुलांस अन्नदान करीत सुसंवाद साधून मुलांचे समवेत सामाजिक बांधिलकीतून उपक्रम राबविला.
या प्रसंगी स्नेहवनात चाकण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, गुप्त वार्ता विभागाचे पीएसआय मोरमारे सर, अप्पासाहे कड, सुनीता कड, डॉ. गौरी कड, समन्वयक अर्जुन मेदनकर, राजेश नागरे अशोक देशमाने आदी उपिस्थत होते.
यावेळी येथील कामकाजाची माहिती अशोक देशमाने यांनी देत स्नेहवनाचे प्रवासातील आठवणी सांगत सेवा सुविधां साठी दानशूर व्यक्ती, संस्था यांनी सद्दिच्छा भेट द्यावी. येथील प्रत्येक्ष कामकाज जवळून पाहण्यासाठी मुक्कामी राहून अनुभव घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
चाकण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी येथील स्नेहवनास सद्दिच्छा भेट देत संवाद साधला येथील कामकाजाची माहिती जाणून घेत कौतुकास्पद उपक्रम राबविला जात असून इतक्या जवळ असलेले स्नेहवन प्रशस्त आणि उत्कृष्ठ कार्य करीत असल्याने त्यांनी कौतुक करीत स्नेहवनास हार्दिक शुभेच्छा दिल्या. ALANDI
अप्पासाहेब कड म्हणाले, येतील मुलांचे शाळा, कॉलेज मधील प्रवेशास अडचणी आल्यास दूर केल्या जातील. तसेच यापुढील काळात सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही दिली. यावेळी येथील दैनंदिनी आणि शालेय कामकाजाची माहिती उपस्थितांनी जाणून घेतली. Alandi
येथील विविध विभागांना भेट देत पाहणी करण्यात आली. या प्रसंगी देशमाने यांनी प्रभावी सुसंवाद साधत माहिती दिली.
हेही वाचा :
मोठी बातमी : देशात एँटी पेपर लीक कायदा लागू, मध्यरात्री अधिसूचना जारी, वाचा काय आहे कायदा !
NER : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत तब्बल 1104 जागांसाठी भरती
MPKV : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती
ब्रेकिंग : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती
युद्ध थांबवले पण पेपरफुटी थांबवता आली नाही… राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका
मोठी बातमी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन
सर्वात मोठी बातमी : पोलिस भरती संदर्भात सरकारचा मोठा निर्णय