आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील दिघी साई पार्क सैनिक कॉलनी येथील क्रांति सिंह नाना पाटील शिक्षण मंडळाच्या यशवंतराव चव्हाण विद्यालयात आज ‘ ओळख श्री ज्ञानेश्वरी ‘ ची या उपक्रमाचा प्रारंभ श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांच्या हस्ते झाला. हरिनाम गजरात प्रशालेस संत साहित्य देखील यावेळी सुपूर्द करण्यात आले. (Alandi)
या प्रसंगी संजय गरुड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याच उपक्रमात श्री संत सेवालाल यांची जयंती देखील प्रशालेत प्रतिमा पूजन करीत अभिवादनाने साजरी करण्यात आली.
यावेळी समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, अर्जुन मेदनकर, संजय गरुड, सचिव अजित गरुड, प्राजक्त हरफळे, विश्वंभर पाटील,संस्थेचे पदाधिकारी अध्यक्षा स्वाती गरुड, सचिव अजित गरुड, प्राचार्या मनिषा निकम, मुख्याध्यापक, संचालक, शिक्षक, तसेच बालक मंदिर, प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Alandi)
समितीचे अध्यक्ष प्रकल काळे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. काळे म्हणाले, घरून आणलेला आईचा डब्बा आणि माउलींनी आपल्यासाठी दिलेला संत साहित्याचा शब्द रुपी हरिपाठ, श्री ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्टी, अमृतानुभव या साहित्याचे श्रवण रुपी सेवन आणि पुढे आपल्या जीवनात यावर मार्गक्रमण केल्यास यश निश्चित आहे. ज्ञानेश्वरी जीवन ग्रंथ असून तो आत्मसात करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मुलांना हरिपाठाचे वाटप करण्यात आले. प्रशालेस माऊलींची प्रतिमा, सार्थ ज्ञानेश्वरी, पारायण प्रत ज्ञानेश्वरी, सार्थ हरिपाठ, ओळख श्री ज्ञानेश्वरी उपक्रमाचे अभ्यासक्रम साहित्य भेट देत सुपूर्द करण्यात आले. तत्पूर्वी श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत सेवालाल यांचे प्रतिमा पूजन, दीपप्रज्वलन करण्यात आले. (Alandi)
यावेळी प्रशालेत अभंग, पसायदान गायन झाले. श्रींचे प्रतिमापूजन तत्पूर्वी प्रतिमा आणि संत साहित्य प्रशालेस सुपूर्द करण्यात आले.
कार्यक्रमाचे यशस्वीसाठी प्राचार्या मनिषा निकम यांचेसह शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले.
Alandi : दिघीत ओळख श्री ज्ञानेश्वरी ‘ ची संस्कारक्षम उपक्रमास प्रारंभ; ज्ञानोबा माऊली नामजयघोषात संत साहित्य सुपूर्द
- Advertisement -