Thursday, December 12, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडAlandi : अलंकापुरीत गीता जयंती एकादशी दिनी इंद्रायणीची आरती

Alandi : अलंकापुरीत गीता जयंती एकादशी दिनी इंद्रायणीची आरती

हरिनाम गजरात गीता जयंती साजरी ; लक्षवेधी पुष्प सजावट (Alandi)

आळंदी / अर्जुन मेदनकर : माऊली मंदिरात परंपरेने हरीनाम गजरात गीता जयंती, एकादशी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी झाली. गीताजयंती आणि नित्यनैमित्तिक एकादशी दिनी होणारी इंद्रायणी आरती हरिनाम जय घोषात झाली. (Alandi)

इंद्रायणी नदी घाटावर आळंदी ग्रामस्थ, इंद्रायणी आरती ग्रुप, राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान, आळंदी जनहित फाउंडेशन, महिला बचत गट सदस्य, पदाधिकारी, महिला मंडळ तसेच आळंदी ग्रामस्थ यांचे वतीने इंद्रायणी नदी घाटावर स्वच्छता करीत इंद्रायणीची आरती हरिनाम गजरात झाली. मोक्षदा एकादशी दिनी इंद्रायणीची आरती करून स्वच्छता करीत सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली. यावेळी महिला भाविक, वारकरी यांची गर्दी झाली होती.

आळंदी मंदिरात भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली होती. श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात परंपरेने एकादशी आणि गीता जयंती धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.

यावेळी देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, व्यवस्थापक माऊली वीर, तुकाराम माने आदी उपस्थित होते. वारकरी शिक्षण संस्थेचे वतीने प्रवचन सेवा तसेच संतोष मोझे सरकार यांचे तर्फे परंपरेने हरिजागर सेवा रुजू होते. श्रींचे दर्शनास भाविकांनी हरिनाम गजरात गर्दी केली. हरिनाम गजरात ग्राम प्रदक्षिणा, मंदिर प्रदक्षिणा करीत एकादशी साजरी केली.

इंद्रायणी आरतीस राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अनिता झुजम यांचे मार्गदर्शनात उपक्रम राबविण्यात आला. यावेळी राणी वाघ, पुष्पा लेंडघरे, विद्या आढाव, तेजल झुजम, शोभा कुलकर्णी, उषा ननवरे, माझी नगरसेविका उषा नरके, शाळां होनावळे, ताई देवरे, साक्षी भांबरे, माऊलींचे मानकरी गणपतराव कुऱ्हाडे, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष संयोजक अर्जुन मेदनकर आदींसह मोठ्या संख्येने महिला, ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी गुणवंत युवा उद्योजक मंगेश झुजम यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. महिला मंडळासह आळंदी जनहित फाउंडेशन तर्फे सत्कार करत गीता जयंती, एकादशी निमित्त फराळ प्रसादाचे वाटप करण्यात आले.

इंद्रायणी नदीचे पावित्र्य जोपासण्याचे आवाहन करीत इंद्रायणी नदी घाटावर आरती उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात सर्वानी सहभागी व्हावे, इंद्रायणी नदीचे प्रदूषण दूर करण्यासाठी उपाय योजनेस पाऊले उचलण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. आळंदी ग्रामस्थ, इंद्रायणी आरती ग्रुपचे वतीने राणी वाघ, माजी नगरसेविका उषा नरके अनिता झुजम, अर्जुन मेदनकर यांनी संयोजन केले. विविध मान्यवरांचे हस्ते इंद्रायणीची आरती झाली. यावेळी पसायदानाने उपक्रमाची सांगता झाली.

संबंधित लेख

लोकप्रिय