Sunday, December 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडALANDI : आळंदीत इंद्रायणी नदीचे जल प्रदूषण ; नदी पुन्हा फेसाळली

ALANDI : आळंदीत इंद्रायणी नदीचे जल प्रदूषण ; नदी पुन्हा फेसाळली

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतून नदीत थेट मैला व रसायन मिश्रित सांडपाणी सोडते (PCMC)

आळंदी / अर्जुन मेदनकर : येथील तीर्थक्षेत्र आळंदीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीला वाढत्या अस्वच्छतेने, नदीतील जल प्रदूषणाने अपवित्रतेचे ग्रहण लागले असून नदीला जलप्रदूषणासह जलपर्णीचा विळखा पडला असून जलपर्णी समस्यां जैसे थे आहे.

इंद्रायणी नदीत पिंपरी चिंचवड महानगरपरिषद हद्दीतून रसायन व मैलामिश्रित सांडपाणी थेट नदीत सोडले जात असल्याने नदी (ALANDI) पांढऱ्या फेसाने पुन्हा एकदा फेसाळली असून केमिकल रसायन मिश्रित पाणी थेट सोडले जात असल्याने भाविक, नागरिकांत नाराजीचा सूर उमटत आहे. Alandi

इंद्रायणी नदीचे सातत्याने होत असलेले जलप्रदूषण INDRAYANI वाढल्याने भाविक, वारकरी आणि नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. पिंपरी चिंचवड महापालिका आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अंकुश प्रदूषण करणाऱ्या घटकांवर राहिला नसल्याने वारंवार नदी पांढऱ्या शुभ्र प्रदुषित पाण्याने फेसाळल्याचे दिसत आहे. Alandi news

आळंदीत इंद्रायणी नदीतून नगरपरिषदेच्या पाणी साठवण बंधाऱ्यात प्रचंड प्रदूषित पाणी, जलपर्णीसह महापालिका हद्दीतून येत आहे. इंद्रायणी नदीवरील पाणी साठवण बंधारा अनेक ठिकाणी दगड निखळले आहेत. यामुळे गळती असून सद्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न निकाली निघाला असला तरी नदीचे वाढते प्रदूषण तीर्थक्षेत्र विकासाची शोकांतिका उघड करीत आहे. Alandi news

देखभाल दुरुस्ती अभावी नदी वरील भक्त पुंडलिक मंदिर परिसरात पाणी साठविण्यावर बंधारा गळतीने मर्यादा आली आहे. येथील बंधा-यासह कोल्हापूर पद्धतीचे बंधा-याचे गळती रोखण्यासह पाणी पुरवठा केंद्राकडील बंधाऱ्याची देखील देखभाल दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून इंद्रायणी नदीचे वाढते प्रदूषण रोखण्याची उपाययोजना करण्याची मागणीसह नदी प्रदूषण रोखण्याची मागणी देहू रानजाई प्रकल्पाचे प्रमुख सोमनाथ आबा, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, आळंदी जनहित फाउंडेशन अध्यक्ष राजेंद्र घुंडरे पाटील यांनी केली आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांना निवेदने देऊन केली आहे. ALANDI

मात्र पुणे जिल्हा प्रशासनाचे नदी प्रदूषण रोखण्याचे उपाय योजनांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. आळंदी हे तीर्थक्षेत्र असल्याने येथे वर्षभर भाविक श्रींचे मंदिरात दर्शनासह तीर्थक्षेत्रातील स्नान महात्म्य जोपासण्यास अपशय येत आहे, आळंदीतून इंद्रायणी नदी वाहते.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतून नदीत थेट मैला व रसायन मिश्रित सांडपाणी सोडले जात आहे. पिंपरी चिंचवड महापालिका सांडपाण्यावर प्रक्रिया न करता थेट नदीत सांडपाणी व रसायन, मैला, मिश्रित पाणी सोडले जात असल्याने नदी प्रदूषण प्रचंड वाढले आहे.

शुक्रवार ( दि. २१ ) इंद्रायणी नदी पांढऱ्या रंगाचे फेसाने पुन्हा फेसाळल्याने नदी प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडल्याने आळंदीत नदी प्रदूषण वाढले आहे. वाढत्या जल प्रदूषणाने अलंकापुरीत भाविक व नागरिकां मधून नाराजी व्यक्त केली जात असल्याचे सामाजिक कार्यकर्ते विचारसागर महाराज लाहुडकर यांनी सांगितले. Alandi news

पिंपरी महापालिकेने इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्याचे कामास सुरुवात केली असून काम अगदी संथ असल्याने पालखी सोहळ्याचे गांभीर्य दिसत नाही. आळंदी स्मशान भूमी परिसरातील नदीत मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचून राहिल्याने परिसरातील नागरिकांना यांचा त्रास होत आहे. येथे नदीत राडा रोडा साचल्याने तसेच नदीत मोठ्या प्रमाणात राडा रोडा टाकला जात असल्याने नदीचे पात्र उधळ झाले असून गवताचे प्रमाण वाढले आहे. Alandi

राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्षाने नदी प्रदूषण वाढले, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्षाने इंद्रायणी नदीचे प्रदूषणात वाढ झाली आहे. नदीतील जलप्रदूषित करणाऱ्या घटकावर गुन्हे दाखल करून कारवाई अभावी नदी प्रदूषण परिसरात वाढले आहे. आळंदीला पाणी पुरवठा केंद्रात येणारे पाणी देखील प्रचंड प्रदूषित असल्याने आळंदी नगरपरिषदेस अखेर भामा आसखेडच्या पाण्याची मागणी करून शुद्धीकरणावर यंत्रणेवरील ताण कमी करावा लागला.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : देशात एँटी पेपर लीक कायदा लागू, मध्यरात्री अधिसूचना जारी, वाचा काय आहे कायदा !

NER : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत तब्बल 1104 जागांसाठी भरती

MPKV : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती

ब्रेकिंग : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती

युद्ध थांबवले पण पेपरफुटी थांबवता आली नाही… राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका

मोठी बातमी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन

सर्वात मोठी बातमी : पोलिस भरती संदर्भात सरकारचा मोठा निर्णय

आंतरराष्ट्रीय योग दिवस : प्राचीन ज्ञानाचा आधुनिक जगाला वारसा

BSF : सीमा सुरक्षा दलात 10वी/12वी उत्तीर्णांसाठी भरती; पगार 81000 पर्यंत

AVNL : आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड, ठाणे अंतर्गत विविध पदांची भरती

मोठी बातमी : वाराणसीत पंतप्रधान मोदींच्या कारवर चप्पल फेक ?

मोठी बातमी : हज यात्रेत 550 जणांचा उष्मघाताने मृत्यू !

मोठी बातमी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १७ व्या हप्त्याचे वितरण

ब्रेकिंग : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

संबंधित लेख

लोकप्रिय