Wednesday, October 23, 2024
HomeAkoleAkole : सामाजिक सौहार्द, एकोपा वाढीस लावण्यास अकोल्यात सर्वपक्षीय नेते-कार्यकर्ते एकवटले!

Akole : सामाजिक सौहार्द, एकोपा वाढीस लावण्यास अकोल्यात सर्वपक्षीय नेते-कार्यकर्ते एकवटले!

Akole : अकोले तालुक्याला मानवतावादी, उदात्त विचारांचा राजकीय-सामाजिक- सांस्कृतिक वैभवशाली वारसा लाभला असला तरी सध्या राजकारणाचा घसरलेला स्तर खूपच चिंताजनक असून यात तालुक्याचे नुकसान होत आहे. यात तातडीने सुधारणा होऊन सामाजिक सौहार्द टिकवून एकोप्याची भावना वाढीस लावण्यासाठी ठोस कृती कार्यक्रम आखण्याची आणि त्याची सर्वांनी काटेकोर अंमलबजावणी करण्याची गरज सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. सामाजिक सौहार्द, एकोप्याची भावना वाढीस लावण्यासाठी अकोल्यात सर्वपक्षीय नेते-कार्यकर्ते एकवटल्याचे सकारात्मक आणि आशादायी चित्र बघायला मिळाले. (Akole)

अकोले तालुक्यातील सामाजिक सौहार्द आणि राजकारणाचा घसरलेला स्तर याबाबत विचार विनिमय करण्यासाठी रविवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात विशेष बैठक झाली. ज्येष्ठ नेते दशरथ सावंत अध्यक्षस्थानी होते. आमदार डॉ. किरण लहामटे, अगस्ती कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर, ज्येष्ठ नेते मधुकर नवले, कारभारी उगले, मधुकर तळपाडे, किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले, सतीश भांगरे, बी. जे. देशमुख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजी नेहे, राष्ट्र सेवा दलाचे विनय सावंत, वकील वसंत मनकर, अगस्ती पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे, सेनेचे महेश नवले, माकपचे सदाशिव साबळे, माधव तिटमे, मंदाबाई नवले, लक्ष्मण नवले, संदीप दराडे, गणेश कानवडे, ओंकार नवाळी या राजकीय पक्षांच्या नेत्यांसह ज्येष्ठ पत्रकार-लेखक शांताराम गजे, शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते भाऊसाहेब चासकर, शाहीन फारुकी, डॉ. संदीप कडलग आदी सामाजिक क्षेत्रात सक्रीय असलेले कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते. (Akole)

कम्युनिस्ट पक्षाचे कारभारी उगले यांनी बैठकीच्या सुरुवातीला प्रास्ताविकाच्या भाषणातून चर्चेला तोंड फोडले. त्यानंतर सर्व वक्त्यांनी घसरलेल्या राजकीय स्तराबाबत चिंतेचा सूर लावला. एकोपा वाढीस लावण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज प्रतिपादन केली. तालुक्यात भविष्यातही राजकारण व समाजकारण विचारांच्याच आधारे होणे गरजेचे आहे. विचारांची लढाई विचारांनीच लढली जावी. वेगळे मत मांडण्याचे इतरांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवले जावे. वेगळे मत म्हणजे विरोधीच मत असे सरसकट मानले जाऊ नये. वैयक्तिक आकस, सुडबुध्दी, थेट संपविण्याचीच भाषा, मारामारी, खोट्या केसेस, बेछूट आरोप, वैयक्तिक निंदानालस्ती हे सर्वथा गैर असून जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर काहीही असो निदान अकोले तालुक्यात तरी असले गलिच्छ राजकारण नकोच अशा भावना अकोले तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बोलून दाखवल्या. तरूण पिढीला व्यसनाधीन बनवून त्यांची माथी भडकविणे, त्यांना वाममार्गाला लावणे, विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना खोट्या केसेसमध्ये अडकवणे, कोर्टकचेरी मागे लावून तरुणांचे करीअर बरबाद करणे यासारखे सर्वंच गैरप्रकार टाळणे ही तालुक्यातील सर्वच राजकीय, सामाजिक कार्यकर्ते यांची जबाबदारी आहे अशा शब्दांत सर्वच वक्त्यांनी मनातली खदखद व्यक्त केली. विचारांची लढाई विचारांनीच लढायला हवी. नव्या पिढीच्या हाती समृद्ध सांस्कृतिक वैचारिक वारसा जपणारा अकोले तालुका सोपवण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांनी मार्गदर्शन करावे, अंकुश ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

युट्यूब चॅनेल्सच्या पत्रकारांनी स्वतःच आचारसंहिता निश्चित करण्याची आवश्यकता व्यक्त झाली. व्यक्तिगत स्वार्थाकरता केले जाणारे बिनबुडाचे बेछूट आरोप असोत किंवा वैयक्तिक निंदानालस्ती करण्याचा प्रयत्न याबाबत युट्यूब चॅनलनी भूमिका ठरवली पाहिजे. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी हे प्रकार टाळण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे याबाबत उपस्थित सर्वांचे एकमत झाले.

सामाजिक सौहार्द आणि समाजात एकोप्याची भावना वाढीस लावण्यासाठी विविध प्रबोधनात्मक उपक्रम राबवण्याचा निर्णय झाला. व्याख्यानमाला सुरू करणे, प्रशासकीय यंत्रणेवर जनांकुश निर्माण करणे, सोशल मीडियाचा गैरवापर करून जातीय धार्मिक तेढ निर्माण करून सामाजिक सलोखा धोक्यात आणणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींनी सामाजिक समस्यांवर प्रबोधन करण्याची आवश्यकता असल्याचे मत सर्वपक्षीय नेत्यांनी बैठकीत नोंदवले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

अलिशान कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू ; निबंध लिहिण्यासह इतर अटी टाकत 15 तासांत जामीन मंजूर

धक्कादायक : एकाच तरूणाने केले ८ वेळा मतदान, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

ब्रेकिंग : इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था अंतर्गत रिक्त पदांची भरती

मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई

२० दिंडोरी, २१ नाशिक लोकसभा मतदारसंघांसाठी आज मतदान

ब्रेकिंग : 10th, 12th बारावीचा निकालाबाबत मोठी अपडेट

पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत? वाचा काय म्हणाले मोदी !

25 दिवसांनंतर बेपत्ता अभिनेता घरी, अभिनेत्याने केला मोठा खुलासा

तुम्ही RSS सुद्धा नष्ट करायला निघाले उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

ब्रेकिंग : सोन्याच्या किंमतीत विक्रमी वाढ, चांदीचाही विक्रम

ब्रेकिंग : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे RSS बद्दल मोठे विधान

पुण्यात विकृतीचा कळस ! पत्नीच्या गुप्तांगला लावले कुलूप

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या एप्रिल महिन्यातील मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर

संबंधित लेख

लोकप्रिय