Friday, April 11, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Salman Khan : गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान खानचा मोठा निर्णय

Salman Khan : बाॅलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावर काही दिवसांपुर्वीच गोळीबार करण्यात आला होता. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. घटनेच्या दोन दिवसातच मुंबई पोलिसांनी आरोपींना आपल्या ताब्यात घेतलं. यावेळी आरोपींनी स्वतः काही खुलासे देखील केले. या घटनेनंतर आता सलमान खानने (Salman Khan) आता मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.

---Advertisement---

अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर 14 एप्रिल रोजी पहाटे गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी ताबडतोब या मागे कोणाचा हात आहे याचा शोध पोलिसांनी लावला. असे असले तरी सलमान खानच्या सुरक्षेबाबत चिंता कायम आहे. अशात आता सलमानने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सलमान आता मुंबईतलं घर सोडून पनवेलला शिफ्ट होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सलमान खानचा पनवेल येथील फार्म हाऊस हा गॅलेक्सी अपार्टमेंटपेक्षा अधिक सुरक्षित असल्याचे बोलले जात आहे. तसेच सलमान खान हा जास्तीत जास्त वेळ पनवेलच्या फार्म हाऊसवर घालवत असतो, त्याला देखील तिथे राहण्यासाठी आवडतं. त्यामुळे सलमान खान मुंबईतलं घर सोडून पनवेलच्या फार्म हाऊसवर शिफ्ट होणार असल्याची माहिती आहे.

---Advertisement---

दरम्यान झालेल्या गोळीबारात लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईचा हात होता, अशी माहिती आता समोर आलीये.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

ब्रेकिंग : सभेच्या मैदानासाठी बच्चू कडूंचा राडा, पोलिसांनीच भाजपचे गमचे…

मोठी बातमी : पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय, वाचा काय आहे कारण !

मोठी बातमी : MDH आणि Everest च्या काही मसाल्यांवर बंदी

खासदार श्रीरंग बारणे यांचा अर्ज दाखल

राज्यातील 11 मतदारसंघात २५८ उमेदवार रिंगणात

ब्रेकिंग : मतदान यादीत नाव नोंदविण्याची आज शेवटची तारिख, असा करा अर्ज !

७५ टक्क्‍यापेक्षा जास्‍त मतदान टक्केवारी साध्‍य करणाऱ्या केंद्राचा होणार सन्‍मान

प्रकाश आंबेडकरांचा खळबळजणक दावा, दोन महिन्यानंतर एकनाथ शिंदे…

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles