Friday, September 20, 2024
Homeताज्या बातम्याPCMC:विकसित भारत संकल्प यात्रा केंद्रास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी भेट देऊन...

PCMC:विकसित भारत संकल्प यात्रा केंद्रास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी भेट देऊन केली पाहणी

पिंपरी चिंचवड /क्रांती कुमार कडुलकर:दि. २८ – विकसित भारत संकल्प यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यास नागरिकांचा उत्फुर्त प्रतिसाद भेटत आहे. शहरात ४२ ठिकाणी आणि प्रत्येक प्रभागातील २ ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रेचे वाहन भेट देणार आहे. आतापर्यंत शहरातील विविध ठिकाणी या वाहनाने भेट दिली असून १० हजारपेक्षा जास्त नागरिकांनी या यात्रेला भेट देऊन विविध योजनांचा लाभ घेतला आहे. उद्या गुरूवार २९ फेब्रुवारी २०२४ रोजी या संकल्प यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप होणार आहे.
विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आधार कार्ड दुरूस्ती केंद्र, पीएम उज्ज्वला योजनेंतर्गत नोंदणी, आयुष्यमान भारत कार्ड, स्वनिधी नोंदणी कॅम्प आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच पंतप्रधान पथविक्रेता, आत्मनिर्भर निधी, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री ई-बस योजना, अमृता योजना आदी विविध योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात येत आहे.

आज संत ज्ञानेश्वर क्रिडा संकुल, इंद्रायणीनगर येथे पार पडलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेस अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी भेट दिली. तसेच त्यांनी विविध कल्याणकारी योजनांच्या केंद्रांना भेट देऊन तेथील माहिती घेतली आणि नागरिकांची विचारपूस केली. यावेळी जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये मधुमेह, रक्तदाब, कुष्ठरोग, हिमोग्लोबीन, मलेरिया, डेंग्यू तसेच इतर रोगांच्या तपासण्या मोफत करण्यात येत आहेत. तरी या सुविधांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय