मुंबई : हिंदी चित्रपटांतील एक नावाजलेली यशस्वी लोकप्रिय अभिनेत्री आणि नृत्यांगना धक धक गर्ल माधुरी दीक्षित यांना भाजपतर्फे लोकसभेचे तिकीट देण्याचे निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सिने अभिनेत्रीना तिकीट देऊन भाजपने सेलिब्रेटींना लोकसभेत पाठवले आहे. Actress Madhuri Dixit will become MP
व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी ठरलेल्या बऱ्याच चित्रपटांत तिने काम केले आहे, त्यांत तिच्या अभिनयाची व नृत्यकौशल्याची खूप वाहवा झाली. इ.स. २००८ मध्ये भारत सरकारतर्फे तिला भारताचा चौथा महत्त्वाचा नागरी सन्मान पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
मुंबईमध्ये गणेशोत्सवानिमित्त अमित शहा, एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस एक बैठक झाली. भाजप आपली लोकसभेची रणनीती तयार करत आहे. त्यानुसार अभिनेत्री माधुरी दीक्षित, ऍड.उज्वल निकम, भाजपचे थिंक टॅंक मधील प्रमुख नेते सुनील देवधर, माजी पोलीस अधिकारी प्रताप दिघावकर या नवीन चेहेऱ्याना मुंबई, पुणे, कोकण विभागातून उमेदवारी देण्याची भाजपची रणनीती ठरली आहे. अमित शहा यांनी काही महिन्यांपूर्वी मुंबई भेटीत माधुरी दीक्षित यांची भेट घेतली होती.