पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : असोसिएशन फॉर द वेलफेयर ऑफ पर्सन मेंटल हॅंडीकॅप (AWMH) यांच्या तर्फे दरवर्षी दिव्यांग मुलांच्या टेबल टेनिस च्या राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येतात. Abhisar Foundation wins mixed title in table tennis state level tournament
शनिवार दि.9 सप्टेंबर2023 रोजी गोरेगाव येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये या राज्यस्तरीय टेबल टेनिसच्या स्पर्धा पार पडल्या. यावेळी एकूण दीडशे दिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या वेळी अभिसार फॉउंडेशनचे खेळाडू 1) मीरा – गोल्ड मेडल, 2) इशांत राहत – सिल्वर मेडल, 3) येश मोहिते – सिल्वर मेडल, 4) अदिती गाडे – सिल्वर मेडल, 5) सोहम जमादार – ब्राँझ मेडल, 6) आयुष धायगुडे – ब्रॉझ मेडल मिळवून या विद्यार्थीनी यश खेचून आणले व अभिसार फाउंडेशन चे नाव लौकिक वाढवले. या विद्यार्थी ना मार्गदर्शन केले होते.
क्रीडा प्रशिक्षक विकास जगताप, ऋषिकेश मुसूडगे, व सहकार्य केले होते. गोपेश कोठारी, प्रिया मॅडम यांनी या यशाबद्दल खेळाडूंचे विविध संस्था, व्यक्ती, संघटना यांच्याकडून अभिनंदन करण्यात येत आहे.