Home पुणे - पिंपरी चिंचवड Aapli PMPML’ Mobile App : लाँच झाले ‘आपली पीएमपीएमएल’ ॲप

Aapli PMPML’ Mobile App : लाँच झाले ‘आपली पीएमपीएमएल’ ॲप

Aapli PMPML' Mobile App

पुणे :१५ ऑगस्ट २०२४ रोजी, स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पीएमपीएमएलच्या “आपली पीएमपीएमएल” मोबाईल ॲपचे उद्घाटन व्यवस्थापकीय संचालक श्रीमती दिपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. हे ॲप १७ ऑगस्ट २०२४ पासून गुगल प्ले स्टोअरवर “Aapli PMPML” नावाने उपलब्ध असेल. (Aapli PMPML’ Mobile App)

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड म्हणजेच पीएमपीएल (PMPL) कडून प्रवाशांसाठी PMPL कडून एक ॲप विकसित करण्यात आलं असून या ॲपमुळे पुणेकरांची मोठी सोय होणार आहे. या ॲप मध्ये मध्ये सर्व बसेस संदर्भात शिवाय मेट्रोच्या तिकिटाची सुद्धा सुविधा मिळणार आहे. दि. 17 ऑगस्ट पासून हे ॲप सुरू होणार आहे. (Aapli PMPML’ Mobile App)

या ॲपचे उद्घाटन पीएमपीएमएलच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.

पीएमपीएमएलचे जनसंपर्क अधिकारी सतीश घाटे यांनी सांगितले की, या ॲपमध्ये सर्व बसेस रूट, वेळा, बस क्रं. आणि संपूर्ण वेळापत्रक आदी सुविधा प्रवाशांना मिळतील.

हे वापरकर्त्यांना महत्त्वपूर्ण माहिती आणि सेवा प्रदान करेल. यासोबतच या ॲपमुळे वापरकर्त्यांना पुणे मेट्रोची तिकिटे खरेदी करणेही शक्य होणार आहे, ज्यामुळे हे ॲप शहरातील सार्वजनिक वाहतुकीसाठी एक व्यापक साधन बनेल.’ असे सतिश घाटे म्हणाले.

हेही वाचा :

मोठी बातमी : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका लांबणीवर, वाचा काय आहे कारण !

सोयाबीनवरील विषाणुजन्य रोगाचा प्रसार करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन

श्री विलेपार्ले केळवणी मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, धुळे अंतर्गत भरती

‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’द्वारे ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्र भेटीची इच्छा शासन पूर्ण करणार

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत भरती

साप पकडताना सर्पमित्राला सापाचा दंश, सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू

Exit mobile version