Saturday, July 6, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडवेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी आधार कार्ड शिबिर - मंथन फाउंडेशनचा उपक्रम

वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी आधार कार्ड शिबिर – मंथन फाउंडेशनचा उपक्रम

पुणे : मंथन फाउंडेशन व रिलीफ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार पेठ, पुणे येथे वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी आधार कार्डचे शिबिर घेण्यात आले व पोस्टाचे बचत खाते उघडण्यात आले. 155 महिलांनी याचा लाभ घेतला.

मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट यांनी सांगितले की वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी संस्था आधार कार्ड सोबतच, रेशन कार्ड काढणे, मतदान ओळखपत्र, बचत खाते उघडणे व संजय गांधी निराधार योजना अनुदानसाठी संस्था मदत करत आहे. 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 64 पदांसाठी भरती, 25000 ते 35000 रूपये पगाराची नोकरी

यावेळी मंथन फाउंडेशन अध्यक्षा आशा भट्ट, रिलीफ फाऊंडेशन अध्यक्ष अनिल बोरकर, संस्थेचे कार्यकर्ते वृषाली गोरे, श्रीराम देशपांडे, आरती गणुरे, गणेश खेडेकर, मेरी डिसोझा, वैशाली ओव्हाळ, आरती आंग्रे, मोनिका कांबळे, डॉ.अभिजीत कांबळे, डॉ.चेतन चव्हाण आदी उपस्थित होते.

श्री नेमाडे (वरीष्ठ पोस्ट मास्टर), श्री दिवेकर (पब्लिक रिलेशन ऑफिसर) व ऑपरेटर विनायक इंगळे, पुणे जिल्हा पोस्ट ऑफिस तसेच मार्गदर्शन जिल्हा रुग्णालय व पुणे जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण संस्था व महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था यांनी या शिबिरासाठी मोलाचे सहकार्य केले.

 

– क्रांतिकुमार कडुलकर

पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 15 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 288 पदांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी काहीच दिवस बाकी

वन विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 20000 ते 40000 रूपये पगाराची नोकरी

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे 113 रिक्त पदांसाठी भरती, आजच अर्ज करा


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय